विरोधी पक्षनेतेपदावरचा काँग्रेसचा दावा
काल काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या चर्चा झाल्या. यावेळी काँग्रेसी नेत्यांनी उबाठाची मनसेशी होणारी संभाव्य युती, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरचा काँग्रेसचा दावा, उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक या मुद्द्यांवर ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. यावेळी महाविकास आघाडीमध्ये मनसे सारख्या पक्षाला समाविष्ट करायचे झाल्यास इतर दोन्ही घटक पक्षांशी चर्चा करावी लागेल, असं देखील चित्र काँग्रेसने स्पष्ट केलं होतं. जर ठाकरे गट महायुतीमधून बाहेर पडला तर बंटी पाटील यांना ठाकरे पाठिंबा देणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे.
advertisement
ठाकरेंनी मनसेला टाळी
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने मोठा धक्का बसला होताच, अशातच आता ठाकरे गट महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार की काय? अशी चर्चा होताना दिसतीये. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि उपनेते अमीन पटेल यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंनी मनसेला टाळी दिल्याने हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेस हायकमांडच्या महाराष्ट्रात नजरा
महापालिका निवडणुकांतही राज ठाकरे हे आमच्याबरोबर राहतील, असे संकेत उघडपणे शिवसेनेकडून व्यक्त होत असताना काँग्रेस पक्ष काय करणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच ठाकरे जर आघाडीसोबत राहिले तर राज ठाकरे पुन्हा काडीमोड करतील का? असा सवाल देखील विचारला जात आहे. तसेच काँग्रेस हायकमांड देखील महाराष्ट्राच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून दुसरा धक्क्यातून बचावाचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय.