मलबार हिल मतदारसंघ इतिहास
उच्चभ्रू व्यापारी मंडळींची निवासस्थानं असलेला हा मुंबईतील अतिश्रीमंत भाग असला तरी मलबार हिल मतदारसंघात वाळकेश्वरबरोबर खेतवाडी, गिरगाव, महालक्ष्मीचा काही भाग येतो. गिरगाव आणि दक्षिण मुंबईतला मराठी टक्का कमी होत असला तरी शिवसेना या मतदारसंघातून मराठी उमेदवार देण्यास प्राधान्य देत होता. आता यंदा महाविकास आघाडीकडून शिवसेनेला जागा सुटली असली तरी सेनेने भैरूलाल चौधरी या जैन नेत्याला उमेदवारी दिली आहे. मुंबईतील एकूण 36 मतदारसंघांपैकी 19 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मलबार हिल मतदारसंघ आम आदमी पक्षाकडे जाणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर मलबार हिल मतदारसंघ देखील ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला आहे. ठाकरेंकडून मलबार हिल मतदारसंघात भैरुलाल चौधरी जैन यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
advertisement
2019 विधानसभा निवडणुकीनंतरचं चित्र
मंगलप्रभात लोढा – भाजप - 93,538
हीरा देवासी – काँग्रेस- 21,666
गेल्या निवडणुकीत मंगलप्रभात लोढा यांना शह द्यायला काँग्रेसने हीरा देवासी यांना रिंगणात उतरवलं होतं. या वर्षी ते कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?
मलबार हिल विधानसभा हा दक्षिण मुंबई लोकसभेअंतर्गत येतो. तिकिट वाटपापासूनच हा मतदारसंघ चर्चेत होता. सेना विरुद्ध सेना अशी थेट लढत तिथे झाली आणि उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडून आले आणि पुन्हा खासदार झाले. एकनाथ शिंदेंनी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना लोकसभेचं तिकिट दिलं होतं. पण अरविंद सावंतांनी त्यांच्यावर मात केली. यामिनी जाधव यांना त्यांच्या स्वतःच्या भायखळा मतदारसंघातून जेवढी मतंमिळाली नाहीत तेवढी मलबारहिलमधून मिळाली. केवळ कुलाबा आणि मलबार हिल मतदारसंघात यामिनी जाधव यांना मताधिक्य मिळालं होतं.
अरविंद सावंत यांना सर्वांत कमी मतं मलबार हिलमधून मिळाली होती. त्यांना केवळ 39573 मतं तर यामिनी जाधव यांना 87860 मतं मलबार हिलने दिली.
दक्षिण मुंबईतील इतर विधानसभा मतदारसंघातील चित्र
वरळी विधानसभा – आदित्य ठाकरे – शिवसेना (उबाठा)
शिवडी विधानसभा – आमदार अजय चौधरी - शिवसेना (उबाठा)
भायखळा विधानसभा - आमदार यामिनी जाधव - शिवसेना
मलबार हिल विधानसभा – आमदार मंगलप्रभात लोढा - भाजप
मुंबादेवी विधानसभा - आमदार अमीन पटेल - काँग्रेस
कुलाबा विधानसभा - आमदार राहुल नार्वेकर – भाजपा
