TRENDING:

अटक वॉरंट जारी, मंत्रीपद टांगणीला, माणिकराव कोकाटे अटक टाळण्यासाठी काय करू शकतात?

Last Updated:

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी जर नाशिक पोलिसांनी केली नाही तर कंटेंप्ट ऑफ कोर्ट याचाच अर्थ न्यायालयाचा अवमान झाल्याचे सांगत याचिकाकर्ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत बाग, प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे. माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदनिका गैरव्यहार प्रकरणी कोकाटे यांचा पाय खोलात गेला आहे.
माणिकराव कोकाटे (मंत्री)
माणिकराव कोकाटे (मंत्री)
advertisement

दुसरीकडे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी जर नाशिक पोलिसांनी केली नाही तर कंटेंप्ट ऑफ कोर्ट याचाच अर्थ न्यायालयाचा अवमान झाल्याचे सांगत याचिकाकर्ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात. त्यामुळे अटक टाळण्यासाठी कोकाटे यांच्याकडे कोणते पर्याय आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.

माणिकराव कोकाटे अटक टाळण्यासाठी काय करू शकतात?

advertisement

- जर सजाप्राप्त आरोपी पोलिसांच्या संपर्कात असेल आणि सरेंडर होण्यासाठी त्याने पुराव्यासहित सबळ कारणे दिली असतील अटक काही दिवस टळू शकते

- वैद्यकीय कारण हे अत्यंत सबळ कारण मानलं जाते. मात्र त्या आरोपीवर सुरू असलेले उपचार आणि हॉस्पिटल अहवाल हा महत्वाचा घटक मानला जातो

- लीलावती हॉस्पीटलचा, नाशिक पोलिसांना सादर होणारा प्रकृती अहवाल हा यात महत्त्वाचा ठरणार

advertisement

- कोकाटे यांच्या आरोग्य अहवालाच्या आधारावर नाशिक पोलीस काही दिवस अटक टाळू शकतात

- अर्थात हॉस्पिटल अरेस्ट हा एक मार्ग असला तरी त्याची अंमलबजावणी ही पूर्णपणे नाशिक पोलिसांच्या भूमिकेवर अवलंबून आहे

- माणिकराव कोकाटे याना कोणत्याही परिस्थितीत अजून दोन दिवस अटक टाळायची आहे

- १९ डिसेंबरला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही तर पोलिसांना सरेंडर व्हावे लागेल किंवा पोलिस हॉस्पिटल अरेस्ट करू शकतील

advertisement

मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन लाटण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला होता. कृषिमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत. विधानसभेत रम्मी खेळण्यामुळे अडचणीत आल्यानंतर त्यांचे कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले. त्यांना युवक कल्याण आणि क्रीडाखाते देण्यात आले.

advertisement

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. १९९५ ते ९७ काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कोकाटे यांनी घर घेतले. कोकाटे यांनी १० टक्के कोट्यातील घरासाठी कमी उत्पन्न दाखवले असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला होता. जवळपास तीन दशके या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षा सुनावली आणि त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने देखील शिक्षा कायम ठेवली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऑफिस बॉय म्हणून केलं काम, ऊसतोड कामगाराचा मुलगा आज 2 कंपनीचा CEO
सर्व पहा

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका सरकारी योजनेतील कागदपत्रांनी अडचणीत आणले. सुमारे ३० वर्षापूर्वीं, १९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटेंविरोधात याचिका दाखल केली. दिघाळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कोकाटेंविरोधात भादंवि ४२०, ४६५, ४७१,४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अटक वॉरंट जारी, मंत्रीपद टांगणीला, माणिकराव कोकाटे अटक टाळण्यासाठी काय करू शकतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल