TRENDING:

Manoj Jarange: 'आमच्या जिल्ह्यातून जाऊ देणार नाही', मनोज जरांगेंनी भर स्टेजवर एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांला दिला दम; नेमकं काय घडलं?

Last Updated:

मागण्य मान्य झाल्यानंतर मनोज जरांगेंनी सगळ्यांचे आभार मानले मात्र शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईकांना टोला लगावला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाला मोठं यश मिळालं असून राज्य सरकारने त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. उपसमितीच्या वतीने करण्यात आलेल्या शिफारशी या योग्य असल्याची खात्री अभ्यासकांनी दिली आहे. मनोज जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडून मान्य केल्या आहेत. यासंदर्भातील जीआर (शासन निर्णय)मनोज जरांगेना स्विकारला असून आझाद मैदानात गुलाल उधळत एक जल्लोष केला. यावेळी व्यासपीठावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील होते. यावेळी सगळ्यांसमोर मनोज जरांगेंनी त्यांना भर स्टेजवर दम देत धाराशिवला जाऊ देणार नाही असा इशारा दिला.
News18
News18
advertisement

गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झालीये. मराठा आरक्षण उपसमितीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांना सरकारच्या निर्णयांबदद्ल माहिती दिली. गुलाल उधळत, आनंद साजरा करत मुंबई सोडणार असल्याची घोषणाही मनोज जरांगेंनी केली. आरक्षणाची लढाई मराठ्यांनी जिंकली अशी घोषणा करताना मनोज जरांगेनी या आंदोलनाचा लेखाजोखा मांडला. यावेळी मंचावक मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले,माणिकराव कोकाटे,उदय सामंत, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सरकारकडून हैदराबाद गॅजेटच्याअंमलबजावणीला मान्यता देण्यात आली, त्यावेळी जरांगेंनी सगळ्यांचे आभार मानले मात्र प्रताप सरनाईकांना टोला लगावला, यावेळी मोठा हशा पिकला.

advertisement

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

सरनाईक साहेब तुम्ही आमच्या गाड्यांवर मोठा दंड लावला आहे, जर माफ नाही केला तर तुम्हाला आमच्या तिथून धाराशिवला जाऊ देणार नाही, असा टोला मनोज जरांगेनी लगवताच मंचावर हशा पिकला आणि मैदानात उपस्थित आंदोलकांनी दाद दिली. माझी एक इच्छा आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषण सोडायला यावे... तुमचं आमचं वैर संपले.

advertisement

जरांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळालंय. आरक्षणाची लढाई जिंकल्यानं आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या लाखो मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. जरांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनंही हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणाचा जीआर काढलाय. मराठा आरक्षण उपसमितीनं तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे राज्य सरकारनं जीआर काढलाय. जरांगेंनी या मसुद्याला मान्यता दिली होती. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी मागील दोन वर्षांपासून सातत्यानं केली होती. मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर हाच एकमेव पर्याय असल्याचं जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं होतं. अखेर राज्य सरकारनं जरांगे पाटलांचं म्हणणं मान्य केलंय.

advertisement

हे ही वाचा :

मनोज जरांगेंनी मागितलं ते सरकारने सगळं दिलं, पण 'या' दोन मागण्या मागे ठेवल्या; त्या कोणत्या?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange: 'आमच्या जिल्ह्यातून जाऊ देणार नाही', मनोज जरांगेंनी भर स्टेजवर एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांला दिला दम; नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल