मनोज जरांगे यांनी मुंबई सोडल्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशिरा त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात अॅडमिट केलं. उपोषणामुळे जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. डॉक्टरांनी त्यांची संपूर्ण तपासणी केली असून, त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना किमान दोन आठवडे पूर्ण आराम करणे आवश्यक आहे. त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असून उपचारांना सुरुवात झाली आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे मराठा समाजात दिलासा व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतल्याचेही दिसत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन मराठा संघटनांकडून करण्यात आले आहे.
मुंबईत उपचार घेण्याची इच्छा असतानाही उपचारांसाठी मनोज जरांगे पाटील मध्यरात्रीच छत्रपती संभाजी नगर येथील गेलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. आझाद मैदानावरील उपोषण आंदोलन संपल्यानंतर सर्व मराठा आंदोलकांनी व्यवस्थित माघारी जाण्याचे आवाहन करताना मी स्वतः मात्र काही दिवस उपचारासाठी इथेच म्हणजे मुंबईतच थांबणार असल्याची घोषणा करणारे जरांगे पाटील मात्र उपोषण आंदोलन संपल्यानंतर काही वेळातच मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले. उपचारांसाठी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील गेलक्सी हॉस्पिटल मध्ये भरती झाले आहेत. सध्या गेलक्सी हॉस्पिटल मध्ये जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.