सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आजच्या मराठीच्या मेळाव्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरे वार करताना राज ठाकरे यांना झुकतं माप दिलं आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाषेसाठी नाही ही तर.. निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी असल्याचे म्हटले. महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली... ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता, अशी टीकादेखील शेलार यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंबतहात जिंकण्याचा प्रयत्न असल्याचे शेलार यांनी म्हटले.
advertisement
तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडूनही आपल्या ट्वीटर हँडलवरून एक कविता ट्वीट करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तुलना करण्यात आली. यामध्ये उद्धव यांच्यापेक्षा राज हेच सरस असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय सिरसाट यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी संयमी भाषण केले, मुद्देसुद भाषण केले. पण उद्धव ठाकरे भाषण तेच टोमणे होते. सर्वकाही आलबेल आहे, असं काही घडलं नसल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव यांनी युतीची साद घातली असली तरी राज यांनी त्यावर प्रतिसाद दिला का, असा उलट सवाल केला.