TRENDING:

Mira Bhayandar Assembly constituency: मिरा भाईंदरमध्ये महायुतीत अखेरच्या क्षणापर्यंत तणाव; मुख्यमंत्र्यांसाठी गुवाहाटीपर्यंत पोहोचलेल्या विद्यमान आमदार पुन्हा अपक्षच

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 Mira Bhaynder Assembly Constituency : महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातही लढत होत असली तरी विद्यमान आमदार गीता जैन यांची ताकदही मोठी आहे. अगदी याच तीन उमेदवारांमध्ये गेल्या निवडणुकीतही लढत झाली होती. त्यात गीता जैन यांनी बाजी  मारली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मिरा भाईंदर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातील एकमेव सीट शेवटपर्यंत भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपातील रस्सीखेचीत अडकली होती. शेवटी तिथे भाजपची सरशी झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने शेवटची चौथी यादी जाहीर केली त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मिरा-भाईंदर या विधानसभा जागेवरचा उमेदवार जाहीर झाला. मिरा भाईंदर विधानसभा मतदारसं घ ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. गीता जैन या विद्यमान आमदार  आहेत. त्या महायुतीकडून लढण्यास उत्सुक होत्या. मुख्यमंत्री शिंदे त्यांना तिकिट देण्यास आग्रही होते. पण अखेर भाजपला ही जागा मिळाली आणि अखरेच्या क्षणी नरेंद्र मेहता यांची उमेदवारी जाहीर झाली.
मिरा भाईंदरमध्ये कोण जिंकणार?
मिरा भाईंदरमध्ये कोण जिंकणार?
advertisement

बहुचर्चचित मिरा भाईंदर मतदार संघातून गीता जैन की नरेंद्र मेहता या वादात अखेर नरेंद्र मेहता यांनी बाजी मारली असली तरी गीता जैन पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीकडून मुझफ्फर हुसेन हे काँग्रेस नेते रिंगणात आहेत. त्यामुळे  मिरा भाईंदर विधानसभा निवडणूक या वेळी तिरंगी होणार.

2019 चाच सामना पुन्हा एकदा

advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांत महाभारत घडलं असलं तरी मिरा- भाईंदरची लढत अगदी 2019 सारखीच होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातही लढत होत असली तरी विद्यमान आमदार गीता जैन यांची ताकदही मोठी आहे. अगदी याच तीन उमेदवारांमध्ये गेल्या निवडणुकीतही लढत झाली होती. त्यात गीता जैन यांनी बाजी  मारली होती.

advertisement

गीता जैन अपक्ष आमदार असल्या तरी त्या महायुती सरकारच्या समर्थक आहेत. त्या मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौर राहिल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीतून बंड करत गुवाहाटी गाठली तेव्हा जे अपक्ष आमदार त्यांच्याबरोबर गुवाहाटीला पोहोचले होते त्यात गीता जैन होत्या. जैन यांना हाताशी धरून शिंदे ही जागा शिवसेनेच्या पदरात पडून घेण्याचे प्रयत्न करत होते. महायुती तर्फे उमेदवारी मिळणार अशी आशा असल्यामुळे जैन यांनी देखील आपली तयारी पूर्ण केली होती. पण अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर झाली नाही आणि शेवटी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना महायुतीचं तिकिट मिळालं.

advertisement

2014 ची निवडणूक भाजप-सेना यांनी स्वतंत्रपणे लढली होती. त्यावेळी भाजपचे नरेंद्र मेहता निवडून आले होते. आता या माजी आमदारांच्या उमेदवारीसाठी भाजपचे प्रभावी नेते रवींद्र चव्हाण आग्रही होते, असं सांगितलं जातं. गीता जैन यांचा पत्ता कापला गेल्यामुळे त्या महायुतीवर नाराज आहेत. त्याचा फटका मेहता यांना बसू शकतो.

महाविकास  आघाडीने काँग्रेसला ही जागा सोडली आहे. सईद मुझफ्फर हुसैन हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले होते. या मतदारसंघात येणाऱ्या अल्पसंख्याक मतांशिवाय दलित मतांवर हुसैन यांचं लक्ष आहे.

advertisement

2019 विधानसभा निवडणूक निकाल

गीता जैन  - अपक्ष – 79,527

नरेंद्र मेहता – भाजप – 63,992

सईद मुझफ्फर हुसैन –काँग्रेस- 55,899

2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?

ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. सहापैकी मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार सोडल्यास बाकी सगळ्या विधानसभांचे आमदार महायुतीत आहेत. तीन भाजप आणि उर्वरित दोन शिवसेनेचे आमदार आहेत.

ठाण्यात प्रथमच दोन सेनांविरुद्धचा सामना लोकसभा निवडणुकीच्या वेळी रंगला. माजी खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंचं समर्थक विरुद्ध एकनाथ शिंदेंचे समर्थक शिवसेना नेते नरेश म्हस्के यांच्यात थेट लढत झाली. नरेश म्हस्के खासदार म्हणून निवडून आले आणि एकनाथ शिंदेंची ठाण्यातली ताकद लक्षात आली. नरेश म्हस्के यांना 39027 एवढं मताधिक्य मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रातून मिळाल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे.

ठाणे जिल्ह्यातील इतर विधानसभा  मतदारसंघ

ठाणे जिल्ह्यात18 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 6 ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील 2019 चं  चित्र

मिरा भाईंदर - गीता जैन (अपक्ष)

ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक (शिवसेना शिंदे गट)

कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना शिंदे)

ठाणे - संजय केळकर (भाजप)

ऐरोली - गणेश नाईक (भाजप)

बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)

भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (शिवसेना)

शहापूर -     दौलत दरोडा (राष्ट्रवादी)

भिवंडी पश्चिम - महेश प्रभाकर चौगुले (भाजप)

भिवंडी पूर्व -        रईस शेख (समाजवादी पार्टी)

कल्याण ग्रामीण -  प्रमोद (राजू) पाटील (मनसे)

मुरबाड - किसन कथोरे (भाजप)

अंबरनाथ -  बालाजी किणीकर (शिवसेना)

उल्हासनगर - कुमार आयलानी (भाजप)

कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (भाजप)

डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)

कल्याण पश्चिम -विश्वनाथ भोईर (शिवसेना)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेलसारखी बिर्याणी घरीच बनवा, ही पद्धत आजपर्यंत कुणीच सांगितली नसेल! Video
सर्व पहा

मुंब्रा-कळवा  -जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mira Bhayandar Assembly constituency: मिरा भाईंदरमध्ये महायुतीत अखेरच्या क्षणापर्यंत तणाव; मुख्यमंत्र्यांसाठी गुवाहाटीपर्यंत पोहोचलेल्या विद्यमान आमदार पुन्हा अपक्षच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल