हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई केली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचाही इशारा दिला आहे. तशी सूचना देणारे फलक दादर कबुतरखाना परिसरात लावण्यात आले आहेत. जैन समाजाच्या परंपरेला आणि जीवदयेच्या तत्त्वाला धक्का लागल्याचा आरोप करत मुनी निलेशचंद्र विजय यांनी केला.
धर्माच्या विरोधात असेल तर कोर्टालाही मानणार नाही...
advertisement
जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हटले की, जे लोक शस्त्र उचलतात, ते आमचे नाहीत. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रं पण उचलू. आम्ही भारताचं संविधान मानतो ना, कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. पण आमच्या धर्माच्याविरोधात आलं तर आम्ही कोर्टालाही मानणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
13 ऑगस्टला मोठा निर्णय...
त्यांनी पुढे म्हटले की, हे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. कबुतरं मरता कामा नयेत. सरकारच्या आदेशानंतर पक्षांना खाद्य टाकणं सुरू झाले आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन हा सगळा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला. मुनी निलेशचंद्र विजय यांनी म्हटले की, “आमचं पर्युषण पूर्ण झाल्यावर 13 तारखेला आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आंदोलन सुरूच राहणार. आम्ही शांत बसणार नाही; शांततामय उपोषण करू. आम्ही शस्त्र उचलणारे नाही, पण गरज पडली तर आम्ही शस्त्रही उचलू,” असा ठाम इशारा मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला.
देशभरातील जैन बांधव एकत्र येणार...
“पालिकेने, कोर्टाने आणि प्रशासनाने आम्हाला नाकारलं, तर आम्ही पुन्हा इथेच आंदोलन करू. देशभरातून लाखो जैन बांधव येथे येऊन शांततामय आंदोलन करतील,” असा इशाराही त्यांनी दिला. दारू आणि कोंबड्यांमुळे किती लोकांचा मृत्यू झाला आहे, हे दाखवा असे आव्हानही प्रशासनाला दिले.
जैन धर्मात मुंगीपासून ते हत्तीपर्यंत प्रत्येक जीवाचा सन्मान केला जातो, याची आठवण करून देत मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले, “जीवदया हा आमच्या धर्माचा मूलमंत्र आहे. आम्ही पालिकेकडे कबुतरांना खाद्य द्यायला परवानगी मागितली आहे. मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये, हे आमच्या धर्मात लिहिलं असल्याचे त्यांनी म्हटले.