नागपूर-इंदूर मार्गावरील गाडी क्रमांक 20912/20911 वंदे भारत एक्स्प्रेस सध्या आठ कोचसह धावते. मात्र मागील काही महिन्यांपासून या गाडीला प्रचंड प्रवासी मागणी असल्याने अनेकांना तिकीट मिळवणे कठीण जात होते. वाढत्या ताणाचा अभ्यास केल्यानंतर कोच वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या मंजुरीनंतर आता या गाडीमध्ये हा मोठा बदल होत आहे.
advertisement
भाविकांसाठी आनंदाची बातमी, जेजुरी चंपाषष्ठी यात्रेसाठी पुणे विभागातून धावणार जादा बस, असं आहे नियोजन
24 नोव्हेंबरपासून गाडीची आसन संख्या दुप्पट
मध्य रेल्वेच्या अधिकृत व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, रोज सोमवार म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून नागपूर-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस 16 कोचसह धावणार आहे. नव्या रचनेत 2 एसी एक्झिक्युटिव्ह क्लास कोच आणि तब्बल 14 एसी चेअर कार्स असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, प्रशस्त आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. गाडीत कोचची संख्या एकदम दुप्पट होत असल्याने अनेक प्रवासी यातून प्रवास करू शकणार आहेत.
प्रवास सुखकर होण्याची अपेक्षा
यामुळे आता प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही अशी अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागपूर-इंदूर या महत्त्वाच्या मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होईल. तसेच सणासुदीचा काळ आणि सुट्ट्यांमध्येही आसन उपलब्धतेची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.






