नागपुरात 8 वीच्या मुलीचं भयंकर पाऊल, प्रकार पाहताच आई-बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश

Last Updated:

Crime in Nagpur: नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा परिसरातून एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका 13 वर्षांच्या शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे.

News18
News18
नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा परिसरातून एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका 13 वर्षांच्या शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून या दुर्दैवी घटनेने पालकांसह संपूर्ण चनकापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरच्या चनकापूर येथील हनुमान मंदिराजवळील झोपडपट्टी भागात घडली. दिव्या सुरेश कौठारे असे आत्महत्या केलेल्या १३ वर्षीय मुलीचं नाव आहे. ती इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती. दिव्याला मोबाईलवर गेम्स खेळण्याची आवड होती. यासाठी तिने आपल्या पालकांकडे मोबाईल मागितला होता.
पण मोबाईल दिल्यास तिच्या अभ्यासावर परिणाम होईल. यामुळे पालकांनी तिला मोबाईल देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे दिव्या गेल्या काही दिवसांपासून अत्यंत तणावात होती. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
घटनेच्या दिवशी, घरात कोणी नसताना दिव्याने नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने तिची आई आणि बहीण घरी परतल्या. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो न उघडल्याने खिडकीतून पाहिले असता त्यांना दिव्या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. हे दृश्य पाहून आई आणि बहिणीने मोठा आक्रोश केला.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
नागपुरात 8 वीच्या मुलीचं भयंकर पाऊल, प्रकार पाहताच आई-बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुक पुढं जाणार की आरक्षण बदलणार?  सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट....
बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर
  • बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर

  • बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर

  • बीएमसी निवडणुक पुढं जाणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठी अपडेट समोर

View All
advertisement