उदयपुरच्या ग्रँड वेडिंगमध्ये माधुरी दीक्षितचा 'चोली के पीछे' आणि 'डोला रे डोला'वर जबरदस्त डान्स, पाहा VIDEO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Madhuri Dixit Dance : उदयपूरमध्ये होत असलेल्या ग्रँड वेडिंगमधले माधुरी दीक्षितचे डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये 'धक धक गर्ल' 'चोली के पीछे' आणि 'डोला रे डोला'वर डान्स करताना दिसत आहे.
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित 'धक धक गर्ल' म्हणून ओळखली जाते. तिने बॉलिवूडमधील अनेक गाण्यांत आपल्या डान्सने चाहत्यांची मने जिंकली आहे. अभिनेत्री आज वयाच्या 58 वर्षांतही आपल्या नृत्याने चाहत्यांना अचंबित करताना दिसतेय. नुकतंच अमेरिकन उद्योगपती राजू रामलिंगा मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेना आणि वामसी गदिराजू यांच्या उदयपूरमधील ग्रँड वेडिंगमध्ये माधुरी दीक्षितने 'चोली के पीछे' आणि 'डोला रे डोला'वर जबरदस्त डान्स केला. माधुरीच्या डान्सचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उदयपूरमध्ये सुरू असलेल्या या भव्य लग्नसोहळ्यात आधीच रणवीर सिंग, जान्हवी कपूर, कृति सेनन आणि शाहिद कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी परफॉर्म केले आहे. तर जेनिफर लोपेझ आणि जस्टिन बीबर यांसारखे हॉलिवूड स्टार्स मुख्य लग्न सोहळ्यात परफॉर्म करताना दिसतील. पण सध्या माधुरीच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'चोली के पीछे क्या है' वर माधुरी दीक्षितचा डान्स
उदयपुरमधील ग्रँड वेडिंगमध्ये समोर आलेल्या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित आपली 32 वर्षांपूर्वीची फिल्म 'खलनायक'मधील 'चोली के पीछे क्या है' या हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सोशल मीडियावर तो झपाट्याने व्हायरल होत असून फॅन्स धक-धक गर्लवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
advertisement
advertisement
माधुरी थिरकली 'डोला रे डोला'वर
माधुरी दीक्षित 'देवदास' या चित्रपटातील 'डोला रे डोला' या आपल्या आयकॉनिक गाण्यावरही थिरकली आहे. माधुरीचा एनर्जेटिक परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या दरम्यान तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा आणि त्यासोबत गुलाबी दुपट्टा परिधान केला आहे. माधुरीला या गाण्यावर डान्स करताना पाहून चाहत्यांना ऐश्वर्या रायचीही आठवण झाली आहे. एका युजरने कमेंट केली,"छान आहे. पण ऐश्वर्या असती तर आणखी मजा आली असती". मूळ गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या दोघींनीही एकत्र डान्स केला होता.
advertisement
advertisement
उदयपुरमध्ये नेत्रा मंटेना आणि वामसी गड्डीराजू यांच्य लग्नाला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. करण जौहर आणि सोफी चौधरी यांनी हा इव्हेंट होस्ट केला. रणवीर सिंह, वरुण धवन, कृती सेनन आणि शाहिद कपूर हे कलाकार लग्नसोहळ्याचा भाग होण्यास उदयपुरला पोहोचले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 12:24 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
उदयपुरच्या ग्रँड वेडिंगमध्ये माधुरी दीक्षितचा 'चोली के पीछे' आणि 'डोला रे डोला'वर जबरदस्त डान्स, पाहा VIDEO


