Mumbai Crime : डॉक्टर गौरीसोबत 24 तास आधी काय घडलं होतं? पंकजा मुंडेंच्या पीएच्या प्रकरणात नवा ट्विस्ट!

Last Updated:

Pankaja Munde PA Wife Case : घाबरून 31 व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी 30 व्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतल्या अवस्थेत होती, असं अनंत गर्जे यांनी म्हटलंय.

Mumbai Anant Garge Wife Case
Mumbai Anant Garge Wife Case
Mumbai Anant Garge Wife Case : मुंबईतील वरळी येथे आत्महत्या करणाऱ्या डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणाला वेगळी दिशा दिली आहे. अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर होते. यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती आणि याबद्दल गौरीने आपल्या वडिलांना माहिती दिली होती, तसेच चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट ही पाठवले होते. काल गौरीने आत्महत्या केली, काल दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते आणि भांडणादरम्यान तिने स्वतःला संपवले, अशी माहिती अनंत गर्जेने दिली.

 घरी पोहोचलो तेव्हा दरवाजे...

शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. गौरी गर्जे यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील त्यांच्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. महत्त्वाचे म्हणजे, गौरी स्वतःला संपवत असताना अनंत गर्जे घरात उपस्थित होते, अशी माहिती कुटूंबियांनी दिली आहे. तर घटना घडली त्यावेळी मी घरी न्हवतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते, असं अनंत गर्जे यांनी म्हटलं आहे.
advertisement

खिडकीतून उतरून मी 30 व्या मजल्यावर...

घाबरून 31 व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी 30 व्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतल्या अवस्थेत होती, असं अनंत गर्जे यांनी सांगितलं. गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी रुग्णालयात नेलं, असंही अनंत गर्जे यांनी म्हटलं आहे. डॉ. गौरी केईएम रुग्णालयाच्या दंतचिकित्सा (डेंटिस्ट) विभागात कार्यरत होत्या.
advertisement

आत्महत्या नाही तर हत्याच...

दरम्यान, गौरीचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता. लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांत असे टोकाचे पाऊल उचलणे म्हणजे आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आपली मुलगी गमावल्यामुळे दुःखी असलेले कुटुंबीय बीडवरून मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. वरळी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला असून, प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : डॉक्टर गौरीसोबत 24 तास आधी काय घडलं होतं? पंकजा मुंडेंच्या पीएच्या प्रकरणात नवा ट्विस्ट!
Next Article
advertisement
''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच सांगितलं, प्रकरणाला नव वळण?
पत्नीने गळफास घेतला, “३१ मजल्यावरून मी…”, अनंत गर्जेंने नेमकं काय सांगितलं?
  • ''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच

  • ''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच

  • ''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच

View All
advertisement