फिक्स्ड की स्टेप-अप SIP? जाणून घ्या कुठे लवकर जमा होईल कोट्यवधींचा फंड
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगले रिटर्न शोधत असाल, तर स्टेप-अप एसआयपी हा एक पर्याय असू शकतो. चला कोट्यवधी रुपयांचा निधी उभारण्याच्या मूलभूत गोष्टींविषयी जाणून घेऊया.
Step up SIP Benefits: भारतीय गुंतवणूकदार दीर्घकालीन कालावधीत भरीव निधी उभारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांचा सतत शोध घेत असतात. तुम्ही तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगले रिटर्न शोधत असाल, तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) तुमच्यासाठी एक पर्याय असू शकतो.
बरेच गुंतवणूकदार दीर्घ कालावधीसाठी एसआयपीमध्ये लहान प्रमाणात गुंतवणूक करतात. तसंच, गुंतवणूक करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली तर तुमचा निधी अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतो. निश्चित एसआयपीऐवजी, तुम्ही स्टेप-अप एसआयपी अंतर्गत गुंतवणूक करू शकता. चला पाहूया की हा बदल तुमच्या रिटर्नवर कसा परिणाम करेल...
फिक्स्ड एसआयपी म्हणजे काय?
फिक्स्ड एसआयपी अंतर्गत, गुंतवणूकदार दीर्घ कालावधीसाठी निश्चित रक्कम गुंतवतात. गुंतवणूकीची रक्कमेत कोणताही बदल होत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही 15 वर्षांसाठी ₹5,000 चा SIP सुरू केला, तर तुम्ही संपूर्ण कालावधीसाठी दरमहा ₹5,000 ची गुंतवणूक करत राहाल.
advertisement
स्टेप-अप SIP
स्टेप-अप SIP मध्ये, गुंतवणूकदार त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे दरवर्षी त्यांची गुंतवणूक रक्कम वाढवतात. उदाहरणार्थ, तुमची मासिक SIP रक्कम ₹5,000 असेल आणि तुम्ही दरवर्षी ती 5% ने वाढवून तुमचा गुंतवणूक प्रवास सुरू ठेवला तर याला स्टेप-अप SIP म्हणतात.
advertisement
रिटर्न बदलू शकतो
फिक्स्ड आणि स्टेप-अप SIP मधील रिटर्नमध्ये तुम्हाला फरक जाणवू शकतो. हे एका उदाहरणाने स्पष्ट करूया: एखाद्याने 25 वर्षांसाठी फिक्स्ड SIP अंतर्गत 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि वार्षिक 15% रिटर्न मिळवला, तर निधी अंदाजे ₹2.76 कोटी असेल.
advertisement
सेम कंडीशनमध्ये, तुम्ही दरवर्षी तुमची गुंतवणूक रक्कम 10% ने वाढवली तर तुमचा निधी ₹5.76 कोटी होईल. याचा अर्थ तुम्हाला निधीच्या जवळजवळ दुप्पट रक्कम मिळेल.
डिस्क्लेमर: (येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमीच तज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या फायदा किंवा तोट्यासाठी न्यूज 18 जबाबदार राहणार नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 11:51 AM IST


