Mumbai News : मुलुंडकरांची वाहतूक कोंडी फुटणार, महापालिकेचा काय आहे प्लान?
Last Updated:
Mulund Traffic Update : मुलुंड पूर्वेकडे प्रवेश करण्यासाठी होणारी कोंडी अखेर फुटणार आहे. म्हाडा जंक्शनऐवजी टाटा कॉलनीशी जोडणाऱ्या 60 फूट रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात येणार असून महिनाभरात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई : मुलुंड पूर्वेकडील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंड पूर्वेकडे वळताना म्हाडा जंक्शनजवळ मोठी कोंडी निर्माण होत होती. ही समस्या सोडवण्यासाठी नव्या 60 फुटी जोडरस्त्याला अखेर सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत. म्हाडा जंक्शनऐवजी हा नवा रस्ता थेट टाटा कॉलनीला जोडणार आहे. त्यामुळे महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना थेट पर्यायी मार्ग मिळणार असून गर्दी टाळता येणार आहे.
वाहतुकीची समस्या कायमची सुटणार
आज (तारीख23)रोजी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार असून पुढील एका महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रस्ता तयार झाल्यानंतर मुलुंड पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल. दररोज सकाळ-संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
या जोडरस्त्याची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. अखेर या विषयावर पाठपुरावा करून मंजुऱ्या मिळवण्यात मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांनीही या रस्त्याची मागणी सातत्याने केली होती. नव्या रस्त्यामुळे वाहतुकीचा ताण विभागला जाईल आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल.
advertisement
महिनाभरात काम पूर्ण झाल्यावर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंड पूर्वेकडे प्रवेश करणे खूपच सोपे आणि वेगवान होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 12:11 PM IST


