याबाबत मिळालेली माहिती अशी की, ख्रिसमसच्या सुट्ट्यानिमित्त सिझान त्याच्या मावशीसोबत फिरण्यासाठी मैदानात गेला होता. त्यावेळी रात्री साडे आठच्या सुमारास मैदानात एक जण गॅसने भरलेल्या फुगे विकत होता. फुगे पाहताच सिझानने फुग्यासाठी हट्ट धरला.
Mumbai News : अंगणात खेळत होती चिमुकली, जेवणाचं आमिष दाखवून 37 वर्षांच्या नराधमाने केलं दुष्कृत्य
फुगे घेण्यासाठी सिझानला घेऊन मावशी फुगेवाल्याकडे गेली. तेव्हा फुगेवाला फुगे फुगवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की सिलिंडर हवेत उंच उडाला. स्फोटात आग भडकल्याने त्यात होरपळून सिझान गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत मावशी आणि आणखी एक महिला जखमी झाली.
advertisement
स्फोटानंतर सिझानसह जखमींना रुग्णालयात नेलं. मात्र सिझानचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेनंतर पोलीस फुगेवाल्याचा शोध घेत आहेत. सिझान आसिफ शेख असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.