Mumbai News : अंगणात खेळत होती चिमुकली, जेवणाचं आमिष दाखवून 37 वर्षांच्या नराधमाने केलं दुष्कृत्य
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
मुंबई, 25 डिसेंबर : राज्याची राजधानी मुंबईत धक्कादायक अशी घटना घडली असून एका ३७ वर्षांच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. अल्पवयीन मुलगी अवघ्या १३ वर्षांची असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ३७ वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुलगी तिच्या घराजवळ खेळत होती. त्यावेळी ३७ वर्षीय व्यक्तीने तिला जेवणाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | A 37-year-old man was arrested by Malwani Police of Mumbai in connection with the rape of a 13-year-old girl. The victim was playing near to her house and the accused lured her with food and raped her. When the girl narrated the incident to the mother, she filed a…
— ANI (@ANI) December 24, 2023
advertisement
मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
भावासोबत राहत असलेल्या पत्नीला दोन मुलांसह संपवलं; क्रिकेटच्या बॅटने घेतला तिघांचा जीव
पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून फरार झालेल्या पतीला ठाणे पोलिसांनी 48 तासात अटक केली आहे. हत्या करून अमित बागडी हा पळून हरियाणाला गेला असताना त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपी अमितचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 8 पथके नेमली होती. त्यातील 2 पथके हरियाणाला रवाना करण्यात आली होती. या पथकांनी तांत्रिक यंत्रणांचा तपास करून अमिताला हरियानाच्या इसा रेल्वे स्थानकातून अटक केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2023 7:06 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : अंगणात खेळत होती चिमुकली, जेवणाचं आमिष दाखवून 37 वर्षांच्या नराधमाने केलं दुष्कृत्य