देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शन
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद आणि सायन्स म्युझियम ग्रुप, लंडन यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोरोना दरम्यान वेगाने लस विकसित करण्याच्या जागतिक प्रयत्नांची कथा सांगणारे प्रदर्शन रामन विज्ञान केंद्र येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या विषयी अधिक माहिती देताना राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे महासंचालक ए. डी. चौधरी म्हणाले की, भारतातील प्रदर्शनाच्या पाच ठिकाणांपैकी या प्रदर्शनाची सुरुवात नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्लीत प्रथम झाली. आता रामन विज्ञान केंद्र नागपूर येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. पुढे सप्टेंबर 2025 पर्यंत मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शन वेलकम, यूके, भारत आणि भारतातील इतर संशोधन आणि वैज्ञानिक संस्थांच्या समर्थनामुळे शक्य झाले आहे.
advertisement
70 किमी समुद्र, बेफाम लाटा अन् काळोखी रात्र, महाराष्ट्राच्या सुपुत्राचा भीम पराक्रम
आधुनिक काळातील लशींच्या निर्मितीची कथा
जानेवारी 2020 मध्ये कोविड- 19 साथीच्या रोगाने धडक दिली आणि प्रचंड जीवितहानी झाली. अशाप्रकारच्या रोगापासून बचाव करण्यासाठी जिथे लस तयार होण्यासाठी अनेक दशके लागायची तिथे जगातील शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रांचा वापर करून या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी प्रभावी लस तयार केली. सायन्स म्युझियम ग्रुपने क्युरेट केलेल्या या प्रदर्शनात आधुनिक काळातील लसीच्या निर्मितीची कथा आणि त्याच्या मानवी बाजूसह अनेक पैलू सांगितले आहे. प्रदर्शनात नवीन विषाणूचे आगमन, नवीन लस डिझाइन करणे, विविध चाचण्या, परिणाम आणि मंजुरी, स्केलिंग अप आणि मास प्रोडक्शन, लस रोलआउट, कोविडसोबत जीवन असे भिन्न भिन्न विभाग आहेत. महामारीच्या वेगाने लस विकसित करण्याचे नवीन मार्ग शोधण्याचा, ऐतिहासिक आणि समकालीन दृष्टिकोनातून लसीकरणाकडे अधिक व्यापकपणे पाहण्याचा जागतिक प्रयत्न येथे प्रदर्शित करण्यात आला आहे.
111 वर्षांचं घड्याळ अन् एकदाही पडलं नाही बंद, ब्रिटिशकालीन टिक-टिक अद्याप सुरूच
काय आहे प्रदर्शनात?
या प्रदर्शनात लसीची निर्मिती, परिणामकारकता व वैज्ञानिक तत्त्वे मांडण्यात आली आहेत. त्यांचा वेगवान विकास, उत्पादन, वाहतूक आणि वितरणासह पडद्यामागील कार्य दर्शविले आहेत. प्रदर्शनात ब्रिटिश कौन्सिलने सुरू केलेली आणि दिल्लीतील भारतीय शिल्पकार सुशांक कुमार आणि लंडनमधील नाटककार निगेल टाउनसेंड यांच्या सहकार्यातून तयार केलेली कलाकृती दाखविली आहे. प्रदर्शनातील लशीची कथा विदर्भातील कानाकोपऱ्यात पोहोचण्याकरिता विशेष मोबाइल व्हॅनदेखील तयार केली असून त्यातून या प्रदर्शनाची माहिती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.