गडकिल्ले आणि शिवराय यांचे नाते अतूट आहे. या दोन गोष्टींचे अद्वैत समजलं तरच शिवचरित्राच्या मर्मात शिरता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला यंदा साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने तात्या टोपे नगर नागरीक मंडळ गणेशोत्सव समितीच्या वतीने किल्ल्यांच्या प्रतिकृती निर्माण करण्यासाठी मला विचारणा करण्यात आली. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हे कार्य करायची संधी उपलब्ध झाली, असं दुर्ग अभ्यासक आणि या किल्ल्यांची प्रतिकृती निर्माती करणारे प्रफुल्ल माटेगावकर यांनी सांगितले.
advertisement
चांद्रयान-3 मध्ये विराजमान झाले गणपती बाप्पा; पाहा कसा साकार झाला हटके देखावा
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले राजगड स्वराज्याची पहिली राजधानी वरून शिवरायांच्या पराक्रमांचा आणि स्वराज्य विस्ताराचा सुवर्णकाळ अनुभवला. इथून साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतःचे सार्वभौम सिद्ध केलं तो गड म्हणजे किल्ले रायगड या दोन्ही किल्ल्यांचे महत्त्व अन्याण्यासाधारण असून हे मोठे शक्ती स्थळे आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनमानसांमध्ये गड-किल्ल्यांची गोडी निर्माण होऊन आपला इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा मंडळांचा मुख्य हेतू आहे.
किल्ले प्रतिकृती साकारण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागला असून पूर्णतः टाकाऊ वस्तू पासून या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या किल्ल्याजवळ संध्याकाळच्या वेळेला साऊंड आणि व्हिडिओच्या माध्यमातून किल्ल्यांचा संपूर्ण इतिहास नागरिकांना सांगण्यात येतो,असंही प्रफुल्ल माटेगावकर यांनी सांगितले.
130 वर्ष जुने गणेश मंदिर आजही विकासाच्या प्रतीक्षेत, पाहा काय आहे इतिहास
तात्या टोपे नगर नागरीक मंडळ गणेशोत्सव समिती, नागपुरातील एक अग्रगण्य संस्था नेहमीच समाज प्रबोधनात तत्पर असलेले हे मंडळ गेल्या 47 वर्षापासुन अविरत गणेशोत्सव साजरा करत आहे. आपण देखील समाजाला काही देणं लागतो. या लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेल्या गणेशोत्सव साजरा करण्याच्या परंपरे खाली आम्ही प्रत्येक वर्षी एक नवीन विषय घेऊन त्यावर प्रदर्शन आणि लघुचित्रपट आयोजित करत असतो.
आजवर मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराष्ट्र पोलिस, भारतीय सैन्यदल, डॉ. कलाम, भारतीय कला, हिंदू सणांचे महत्व यांसारखे विविध विषय घेऊन समाज प्रबोधन केले आहे. ज्याला गणेश भक्तांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. इतकेच नव्हे, तर आमच्या मंडळाला सांस्कृतिक वारसा देखील लाभला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांचा कलेचे सादरीकरण आमच्या मंडळात प्रस्तुत केले आहे, असं मंडळाचे पदाधिकारी श्रेयस पांडे यांनी सांगितले.
पुण्यातील 10 गणपतींचं घरबसल्या घ्या दर्शन; पाचवा बाप्पा पुणेकरांसाठीच काय पण महाराष्ट्रासाठीही खास!
दरवर्षी अनेक मान्यवर मंडळाला भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असतात. या वर्षी मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून शिवरायांना वंदन म्हणून हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड आणि रायगड या किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारलेली आहे. महाराजांच्या किल्ल्यांचे महत्व हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हाच या मागचा मुख्य उद्दिष्ट आहे, असे श्रेयस पांडे यांनी सांगितलं.