ग्रामपंचायतीच्या बैठकीत विविध समस्या, मुद्यावरून बाचाबाची किंवा किरकोळ वाद होत असतात. पण नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. विषय मंजुरी वरून हा राडा झाल्याची माहिती समोर येतं आहे.
नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीत आज ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या ग्रामसभेला महिला पूरुष आणि तरूण वर्ग असे सगळेच उपस्थित होते. यावेळी विषय मंजुरी वरून बैठकीत मोठा राडा झाल्याची घटना घडली. यावेळी दोन गट आमने सामने आले होते. काहींनी लाकडी दाडक्यांनी मारहाण सूरू केली होती. तर काहींनी खुर्च्या हातात घेऊन फेकाफेकी सूरू केली होती. तर काही लोक लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. या दरम्यान काही महिला देखील या राड्यात सामील होत्या.
तब्बल अनेक मिनिट हा राडा सूरू होता. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत कुणाला किती मार लागला आहे? कुणी गंभीररित्या जखमी झालेय की नाही?याची माहिती मिळू शकली नाही.या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार झाल्याची माहिती नाही आहे. पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.