TRENDING:

पोलिसांनी अद्दल घडवली, आरोपींना गुडघ्यावर आणले, नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला म्हणायला लावलं

Last Updated:

Nashik News: सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआयचे प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक करण्यात आले आहे. भूषण लोंढे याने बारमध्ये गोळीबार केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : गोळीबार आणि खंडणी प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आलेल्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढे यांना आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवून माजलेल्या आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेण्यात आले. प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढे याला १२ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
नाशिक पोलिसांकडून लोंढे बाप लेकाला अटक
नाशिक पोलिसांकडून लोंढे बाप लेकाला अटक
advertisement

सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते, कुणाला धमकावले जाते. दुकानदारांकडून हफ्ते मागितले जातात. नकार दिला तर त्यांना मारहाण केली जाते. एकंदरित या परिसरात लोंढे गँगची दहशत मोठी आहे. राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून आम्हाला कुणीच हात लावू शकत नाही, असे लोंढे गँगमधील सदस्य अप्रत्यक्षपणे वागण्यातून सांगत होते. त्याच आरोपींचा माज आज नाशिक पोलिसांनी मोडला.

advertisement

प्रकाश लोंढे यांचा एक पुत्र भूषण लोंढे अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे, मात्र या प्रकरणात राजकीय गुन्हेगारांनी अशाप्रकारे घोषणा दिल्याने कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हा संदेश पोलिसांनी दिला आहे. नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींना नाशिक कोर्टात हजर केले. गोळीबार प्रकरणातील प्रकाश लोंढे आणि तिघांना १२ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे असे म्हणायला पोलिसांनी आरोपींना भाग पाडले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला घरीच बनवा खमंग आणि खुसखुशीत शेव, या टिप्सने बनणार नाही तेलकट, Video
सर्व पहा

सातपूर गोळीबार प्रकरणी आतापर्यंत सात जण पोलिसांच्या ताब्यात, तर भूषण लोंढेसह इतर अद्याप फरार आहेत. प्रकाश लोंढे, दिपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे यांच्यावर गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी मेश्राम कुटुंबाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल पाटील, आकाश अडांगळे, दुर्गेश वाघमारे या तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलिसांनी अद्दल घडवली, आरोपींना गुडघ्यावर आणले, नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला म्हणायला लावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल