स्फोट कशामुळे झाला?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सातपूर परिसरातील रस्त्यावर घडली. एका वाहनाचे चाक डिझेलच्या ड्रमवरून गेल्याने तो ड्रम फुटला. त्यातून डिझेल सर्वत्र उडाले आणि या डिझेलने लागलीच पेट घेतला. स्फोट आणि आग लागण्याचे नेमके कारण म्हणजे, ड्रम फुटल्यानंतर जवळच सिगारेट पीत असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर डिझेल उडाल्याने ती व्यक्ती आगीच्या भक्ष्यस्थानी आली.
advertisement
आगीत सात जण होरपळले, प्रकृती गंभीर
या भीषण स्फोटामुळे आणि आगीमुळे एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे सातपूर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.