नांदुरी ते सप्तशृंग गड या 10 किलोमीटरच्या घाट मार्गावर सध्या काँक्रिटीकरण आणि संरक्षक भिंतीचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग डोंगराळ, अरुंद आणि तीव्र वळणांचा असल्याने कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू ठेवल्यास अपघाताचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आगामी चैत्रोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने सहायक जिल्हाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.
advertisement
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 3 महिने भाविकांसाठी बंद, कारण काय? पाहा सविस्तर
असे असेल वाहतुकीचे 'नवे वेळापत्रक' (एकेरी वाहतूक)
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एका बाजूची शेवटची गाडी पोहोचेपर्यंत विरुद्ध दिशेची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येईल. प्रवासाचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रक नीट समजून घेणं गरजेचं आहे. 12 जानेवारी ते 15 मार्च 2026 या कालावधीत वाहतुकीचे हे वेळापत्रक लागू असणार आहे.
नांदुरी ते सप्तशृंगी गड सकाळी सहा ते साडेसहा, आठ ते साडेआठ, दुपारी बारा ते साडेबारा, दोन ते अडीच, तिसऱ्या सत्रात चार ते साडेचार आणि सहा ते साडेसहा, रात्री आठ ते साडेआठ आणि दहा ते साडेदहा, मध्यरात्री बारा ते साडेबारा, दोन ते अडीच आणि चार ते साडेचार या कालावधीत वाहने सोडली जातील.
सप्तशृंग गड ते नांदुरी या मार्गावर सकाळी सात ते साडेसात, नऊ ते साडेनऊ, अकरा ते साडेअकरा, दुपारी एक ते दीड, तीन ते साडेतीन, पाच ते साडेपाच, सायंकाळी सात ते साडेसात, रात्री नऊ ते साडेनऊ, अकरा ते साडेअकरा, मध्यरात्री एक ते दीड, पहाटे तीन ते साडेतीन आणि पाच ते साडेपाच वाजता ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता रोहिणी वसावे यांनी स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्ते कामात अडथळा न येण्यासाठी हे बदल अनिवार्य आहेत. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि या वेळापत्रकानुसारच आपला प्रवास निश्चित करावा.






