स्पर्धेसाठी लोगो प्रस्ताव 20 डिसेंबर 2025 पर्यंत पाठवता येतील. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीस संरचना जाहीर करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी तीन लाख रुपये, द्वितीयसाठी दोन लाख रुपये आणि तृतीयसाठी एक लाख रुपये रोख पारितोषिक, तसेच प्रमाणपत्र दिले जाईल.
advertisement
सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या ऐतिहासिक महाकुंभाच्या प्रतीकात अध्यात्म, संस्कृती आणि नाशिक-त्र्यंबकेश्वरचे वैशिष्ट्य प्रतिबिंबित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या अटी काय?
स्पर्धेच्या अटींनुसार बोधचिन्ह ए-1 आकाराच्या पोस्टरवर (पीडीएफ, कमाल 5 एमबी) सादर करणे आवश्यक आहे. रंगीत व कृष्णधवल आवृत्तींसह 150 शब्दांची स्पष्टीकरणात्मक टिप्पणी जोडणे अनिवार्य आहे. पोस्टरमध्ये किंवा फाईलमध्ये नाव, संस्था किंवा वैयक्तिक ओळख असू नये. प्रत्येक स्पर्धक एकाच प्रवेशिका सादर करू शकतो. डिझाइनच्या सोबत रंगसंगती, टायपफेस, दृश्य घटक आणि विविध माध्यमांवरील अनुप्रयोग दर्शविणे आवश्यक आहे.
देशभरातील 12 वर्षांवरील नागरिक, व्यावसायिक डिझायनर्स, कलाकार आणि विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी www.mygov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ntkmalogocompetition@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे प्राधिकरणाकडून कळविण्यात आले आहे.






