50 हजार बंगाली बांधवांच्या मागणीला यश
नाशिकमध्ये गेल्या तीन-चार पिढ्यांपासून स्थायिक असलेल्या सुमारे 50 हजार बंगाली बांधवांची ही दीर्घकालीन मागणी होती. 'बंगाली कल्चर असोसिएशन'च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नितीन सिंग बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, या विमानसेवेमुळे शिक्षण, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील नागरिकांना मोठा फायदा होईल.
advertisement
वेळ आणि पैशांची होणार बचत
सध्या नाशिकहून कोलकात्याला जाण्यासाठी प्रवाशांना मुंबई किंवा पुणे गाठावे लागते. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो. ही थेट सेवा सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ 5-6 तासांनी कमी होईल. कनेक्टिंग फ्लाईट्सचा मनस्ताप वाचेल. तसेच पर्यटन आणि स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळेल.
इंडिगो आणि एअर इंडिया सकारात्मक
नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्यासाठी एअर इंडिया, इंडिगो आणि आकासा एअर या कंपन्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी इंडिगो आणि एअर इंडिया या कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
रेल्वेचाही पाठपुरावा: 'दुरांतो'च्या थांब्यासाठी साकडे
विमानसेवेसोबतच रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 'बंगाली कल्चर असोसिएशन'ने कंबर कसली आहे. मुंबई-कोलकाता दुरांतो सुपरफास्ट एक्स्प्रेसला नाशिक रोड स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला डॉ. संदीप रॉय, समरनाथ बॅनर्जी, सुमन घोष, शेखर घोष, सौमित्र मुखर्जी, सुराजित सेनगुप्ता यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.






