नाशिक : महाराष्ट्रातील प्रत्येक भागात विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. तसेच विविध रेस्टॉरंट्समुळे तेथील भागाची ओळख होत आहे. आज नाशिकमधील एकाच एका ठिकाणबाबत आपण जाणून घेणार आहोत. नाशिक येथील प्रसिद्ध असलेली पेरूची वाडी येथील मिसळ नाशिककरांना खूप आवडते. इतकेच नाही तर या ठिकाणी बाहेरच्या देशातून आलेल्या नागरिकांनाही पेरुची वाडी येथील मिसळ खूप आवडत आहे.
advertisement
नाशिकची चव पेरूच्या वाडीमुळे आज भारताबाहेरही पोहोचली आहे. याठिकाणी पर्यटक लांब लांबुन येत असतात. या ठिकाणी तुम्हला फक्त मिसळच नाही तर पेरुपासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांची देखील चव चाखायला मिळते. सकाळी पाच वाजेपासून ही मिसळ बनण्यास सुरुवात होते. दररोज याठिकाणी 1 हजार ते 1500 ग्राहक येतात.
hara hachi bu : आयुष्य वाढणार, लठ्ठपणाही दूर होणार; काय आहे 'हारा हाची बु' ही जपानमधील संकल्पना
सर्व सामान्य लोकांना पूरक अशी ही मिसळ घरगुती मसाल्यांनी तयार केली जाते. विशेष म्हणजे शरीराला हानीकारण नसलेले पदार्थच यात टाकले जात असतात. या ठिकाणी मिसळ भाकरी, मटकी मिसळ, शेव मिसळ, गुळाची जिलेबी, पेरुची लस्सी, पेरुचे आईस्क्रीम, पेरुचे जूस आणि पेरुचा चहासुद्धा मिळतो. यासोबतच याठिकाणी मिसळ थाळी सुद्धा मिळते. या मिसळ थाळीची किंमत ही प्रति प्लेट 120 रुपये आहे. अतिशय चविष्ठ आणि उत्तम क्विलिटी मिसळ याठिकाणी मिळते.
पेरूची वाडी येथील परिसरही ग्राहकांनी नक्कीच आकर्षित करतो. कारण याठिकाणी पेरुच्या वाडीसोबत पक्ष्यांची वाडीही पाहायला मिळते. या ठिकाणी अनके प्रजातीचे पक्षी त्यांनी ठेवले आहेत. काही पक्षी तर परदेशातील आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांसोबत तुम्ही या अतिशय अशा पेरुची वाडी याठिकाणी या चविष्ट अशा मिसळचा आनंद घ्यायला नक्की येऊ शकतात.





