hara hachi bu : आयुष्य वाढणार, लठ्ठपणाही दूर होणार; काय आहे 'हारा हाची बु' ही जपानमधील संकल्पना

Last Updated:

बदललेल्या जीवनशैलीमुळे शारीरिक समस्या जास्त प्रमाणात वाढत आहेत. हल्ली लठ्ठपणा ही समस्या सगळ्यांसाठी चिंतेची बाब बनली आहे. पण असे असताना जपानमधील लोक हारा हाची बू ही संकल्पना अमलात आणून आपण लठ्ठपणा या समस्येवर तोडगा काढू शकतो.

+
हारा

हारा हाची बु संकल्पना

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : दिवसेंदिवस आपल्या जीवनशैलीमध्ये बदल होत आहेत. यामुळे राहणीमान, खानपान, झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयी या बाबतीत बरेच बदल होत आहेत. यामुळे आपल्या आरोग्यावर देखील सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र, बदललेल्या जीवनशैलीमुळे शारीरिक समस्या जास्त प्रमाणात वाढत आहेत. हल्ली लठ्ठपणा ही समस्या सगळ्यांसाठी चिंतेची बाब बनली आहे. पण असे असताना जपानमधील लोक हारा हाची बू ही संकल्पना अमलात आणून आपण लठ्ठपणा या समस्येवर तोडगा काढू शकतो. ही संकल्पना नेमकी काय आहे, याबाबत आहार सल्लागार डॉ. अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली. हारा हाची बू ही जापानी संकल्पना नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
हारा हाची बु ही एक जापानी संकल्पना आहे. यानुसार आपण आपले जठर केवळ 80 टक्केच जेवणाने भरायचे आहे. म्हणजेच पूर्णतः 100% पोट भरून जेवण आपल्याला करायचे नाही. यात संकल्पनेनुसार आपण 80% जेवण केले तर आपले आयुर्मान वाढते. त्याचबरोबर यामुळे आपल्याला लठ्ठपणा आणि पचनाची समस्या येणार नाही.
advertisement
या संकल्पनेला धरून आयुर्वेदामध्येही एक संकल्पना आहे. या संकल्पनेचे नाव त्रिविक कुक्षी विभाग आहे. या संकल्पनेनुसार आपण आपल्या पोटाचे तीन भाग करायचे आहेत. त्यामध्ये एका भागात स्थूल पदार्थ म्हणजे जेवण, दुसऱ्या भागात द्रव पदार्थ म्हणजेच पेय पदार्थ, तर तिसरा भाग हा रिकामा ठेवायचा आहे. यानुसार जर आपण आहार पद्धती ठेवली तर जापानी संकल्पनेप्रमाणे आपण दीर्घायु तसेच पोटाच्या विकारांपासून मुक्त जीवन जगू शकतो.
advertisement
या दोन पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब आपल्या जीवनशैलीत केल्यास आपण दीर्घायुष्य जगू शकतो त्याचबरोबर आपल्याला अपचन, अॅसिडिटी, लठ्ठपणा, पचनाचा त्रास यासारखे कोणतेही विकार जडणार नाहीत. त्यामुळे जेवण करत असताना पोटभर न जेवता 20 ते 30 टक्के पोटाचा भाग रिकामा ठेवल्यास आपल्याला रोगमुक्त आणि दीर्घायु आयुष्य जगण्यास मदत होते, अशी माहिती ओबीसीटी कन्सल्टंट डॉ. अमृता कुलकर्णी यांनी दिली.
advertisement
सूचना: या बातमीत दिलेली माहिती ही तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. अशा कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही हानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
hara hachi bu : आयुष्य वाढणार, लठ्ठपणाही दूर होणार; काय आहे 'हारा हाची बु' ही जपानमधील संकल्पना
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement