नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांच नाव देण्यासाठी अनेक वर्षापासून मागणी होत होती.पण यावर कोणताच काढला जात नव्हती.पण अखेर आता याबाबत निर्णय़ घेण्यात आला आहे. दि बा पाटील यांच्या नावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली होती. या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राज्याने सुचवलेल्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं.तसेच दि बा पाटील यांच्या व्यतिरीक्त इतर कोणाच ही नाव विचारात नव्हतं. त्यामुळे अखेर दि बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीय याबाबत निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांच नाव दिलं जाणार आहे.
advertisement
या प्रकरणी आता आमदार प्रशांत ठाकूर न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली आहे. लोकनेते दि बा पाटील यांच नाव विमानतळाला लागलं पाहिजे ही मागणी भूमिपूत्र आणि प्रकल्पग्रस्तांची होती.याच्यासाठी आम्ही 2021 च्या जूनला आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनानंतर जेव्हा महायूतीच सरकार आलं. आणि त्यावेळी पहिल्या कॅबिनेटमध्येच हा निर्णय घेण्यात आला होता. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात देखील ते पास केलं.त्यानंतर केंद्राकडून मंजूरी मिळण्याची प्रतिक्षा होती. या दरम्यान ज्या लोकांचा आंदोलनाशी संबंध नाही ते या प्रकरणात संभ्रम पसरवत गेले, त्यामुळे थोडा संभ्रम होता,असे ठाकूर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जी बैठक बोलावली होती.त्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.आणि या नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारकडून दि बा पाटील यांच नाव पाठवलं होते. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील चर्चा होती. आणि पंतप्रधानांनी राज्याने पाठवलेल्या नावाचा स्वीकार केला होता.त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांच नाव देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.