Solapur: सोलापूर MIDC मध्ये अग्नितांडव, कंपनीला भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

Last Updated:

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर: सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिंचोली एमआयडीसीमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली आहे. ही एक केमिकल कंपनी असून कंपनीत काही कामगार अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पण वेळीच सर्व कामगार हे बाहेर पडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला दुपारच्या सुमारास आग लागली. कंपनीमध्ये वेल्डिंगचं काम सुरू होतं. त्याचवेळी ठिणगी पडल्यामुळे आग लागली असल्याचं सांगण्यात आलं. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं होतं. आगीच्या भक्षस्थानी कंपनी सापडली. सुरुवातील एकाच विभागात ही आग पसरली होती. पण काही वेळानंतर कंपनीही आगीच्या भक्षस्थानी सापडली.
advertisement
दूरपर्यंत आग आणि धुराचे लोट दिसून येत आहे. केमिकल कंपनी असल्यामुळे आग काही क्षणात पसरली.  या कंपनीत काही कामगार अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. ३० कामगार या कंपनीत काम करत आहे. पण वेळीच सगळे कामगार हे बाहेर आले होते.
मात्र आग प्रचंड भीषण असल्याने कंपनीकडे जाण्यास नागरिकांनी मज्जाव करण्यात आला आहे. कंपनीत मोठ्याप्रमाणात स्फोटाचे आवाज येत असल्याची स्थानिकांची माहिती दिली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.  आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: सोलापूर MIDC मध्ये अग्नितांडव, कंपनीला भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement