दसरा सणाला गालबोट! वर्ध्यात देवीचे विसर्जन करताना दोन तरुण बुडाले, परिसरात हळहळ

Last Updated:

दसऱ्याच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

News18
News18
नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा:  वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. दारोडा गावाजवळ देवीच्या विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा वणा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. दसऱ्याच्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दारोडा येथील दोन युवक गुरुवारी संध्याकाळी देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी वणा नदीकाठी गेले होते. विसर्जनासाठी ते नदीत उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक खोल पाण्यात गेले. काही क्षणातच दोघेही पाण्याच्या प्रवाहात बुडाले. या घटनेनंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह आणि खोलीमुळे ते अयशस्वी ठरले.
advertisement

विसर्जनाच्या वेळी नेमकं काय घडलं?

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. बराच वेळ चाललेल्या शोधानंतर दोन किलोमीटर अंतरावर टेंबा शिवारात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. मृतकाचे नाव विशाल मनोहर पोहाणे (रा. दारोडा) असे असून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे तर दुसरा युवक हर्षल नत्थूजी चाफले (रा. दारोडा) याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. त्याचा शोध सुरू असून एनडीआरएफचे जवान आणि मच्छिमार रात्री उशिरापर्यंत पाण्यात शोध घेत होते, मात्र अंधारमुळे अडचण येत असल्याने रात्री शोधकार्य थांबवले.
advertisement

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

सकाळी पुन्हा शोधकार्य पुन्हा सुरू केला. हर्षलचा एनडीआरएफ पथक आणि स्थानिक मच्छीमाराकडून अजूनही शोध सुरू आहे. या घटनेनंतर दारोडा परिसरात शोककळा पसरली आहे. दसऱ्याच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. विशालच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हर्षलचा शोध लागावा, अशी प्रार्थना गावकरी करत आहे.
advertisement

काळजी घेण्याचे आवाहन

दरम्यान, नदीकिनारी विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वणा नदीत पाण्याचा प्रवाह वाढलेला असून अंदाज येत नाही. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दसरा सणाला गालबोट! वर्ध्यात देवीचे विसर्जन करताना दोन तरुण बुडाले, परिसरात हळहळ
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement