स्थानिक युती आघाडीबाबतचा आढावा घेऊन निरीक्षकांनी लवकरात लवकर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे अहवाल देण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व निरीक्षकांना केल्या आहेत. पुढच्या तीन ते चार दिवसांत स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेऊन युती आघाडीबाबतचे विश्लेषण पक्षप्रमुखांकडे निरीक्षकांनी करणे अपेक्षित आहे.
कोणत्या महापालिकेसाठी कोण निरीक्षक? राष्ट्रवादीकडून नावे जाहीर
खासदार सुप्रिया सुळे- पुणे महापालिका निवडणूक
advertisement
अमोल कोल्हे- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक
जितेंद्र आव्हाड- ठाणे महापालिका निवडणूक
जयंत पाटील- सांगली महापालिका निवडणूक
अनिल देशमुख- नागपूर महापालिका निवडणूक
शशिकांत शिंदे- नवी मुंबई महापालिका निवडणूक
अमर काळे- चंद्रपूर महापालिका निवडणूक
जाहीर केलेल्या बहुतांश निरीक्षकांकडे आपापल्या जिल्ह्यातील महापालिकांची जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची चाचपणी करण्याची जबाबदारी असेल. जयंत पाटील यांच्याकडे गृहजिल्हा सांगलीत आघाडीची समीकरणे लक्षात घेऊन गणिते आखण्याची जबाबदारी असेल. नवी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे भाजपकडून महापालिका हिसकावून घेण्याची आणि त्यादृष्टीने आखणी करण्याची जबाबदारी असेल.
