TRENDING:

आधी वाल्मीकचे फोटो, मग धनुभाऊंचं भाषण, नंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, "गुंड पाळू नका", नेमका रोख कुणाकडे?

Last Updated:

पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात सुरुवातीला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असणारे मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा फोटो झळकला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा नुकताच सावरगाव घाट इथं पार पडला. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांचे बंधू आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. पंकजा मुंडेंच्या आधी धनंजय मुंडेंनी देखील भाषण केलं. आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले, असं धनंजय मुंडेंनी भाषणात सांगितलं. यानंतर अवघ्या दहा मिनिटांत पंकजा मुंडेंनी गुंड पाळू नका, असं आवाहन केलं आहे. यानंतर आता त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
News18
News18
advertisement

खरं तर, पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात सुरुवातीला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असणारे मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा फोटो झळकला होता. We Support Walmik Anna असा मेसेजही या पोस्टरवर लिहिला होता. बीडमध्ये आधीच देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापलं असताना पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात अशा प्रकारे पोस्टर झळकल्याने चर्चेला उधाण आलं होतं.

advertisement

या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. या सगळ्या घडामोडीनंतर पहिल्यांदा जाहीरसभेत धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं. आपल्याला गोवण्यात आल्याचं म्हटलं. धनुभाऊंच्या भाषणानंतर अवघ्या काही मिनिटांत पंकजा मुंडेंनी गुंड पाळू नका, असं आवाहन केलं. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या?

advertisement

पंकजा मुंडे भाषणात म्हणाल्या, "भगवान बाबा नेहमी म्हणायचे, 'एक एकर रान विका, पण शिका'. पण मला तुम्ही शिकलेले वाटत नाही. मी पंकजा गोपीनाथ मुंडे... माझ्यावर, मुंडेंसाहेबांवर आणि भगवान बाबांवर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना मी आवाहन करते की, की दोन घास कमी खा... पण स्वाभीमानाने राहा... कुणाचे तुकडे उचलू नका, कुणाचे पैसे घेऊ नका, खोटे कामं करू नका, खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, हे करण्याची काही गरज नाही, चांगल्या माणसासोबत चांगलंच होत असतं. त्यांच्यामागे भगवान बाबाचे आशीर्वाद असतात."

advertisement

पाहा PHOTOS: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मीक कराडचे फोटो, खास मेसेजही झाला VIRAL

मंत्री पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात आलेल्या कराड समर्थकांकडून वाल्मीक कराड यांचे फोटो असलेले बॅनर झळकले आहेत. या फोटोवर खास संदेश देखील लिहिण्यात आला आहे. सविस्तर बातमी

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी वाल्मीकचे फोटो, मग धनुभाऊंचं भाषण, नंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, "गुंड पाळू नका", नेमका रोख कुणाकडे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल