भोयर यांनी कठोर भाषेत आमदार बंब यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटलं की, “चार फुटाचे आमदार प्रशांत बंब हे शिक्षण व्यवस्था घडवणाऱ्या शिक्षकांविषयी सातत्याने अर्वाच्य भाषा वापरत आहेत. शिक्षक देशाची पिढी घडवतात, आणि दोन-तीन टक्के लोकांच्या गैरवर्तनावरून संपूर्ण समाजाला वाईट ठरवणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले.
शेखर भोयर यांनी थेट इशारा देत म्हटले की, “यापुढे शिक्षकांविषयी शिवराळ, अर्वाच्य भाषा वापरली, तर शिक्षक रस्त्यावर उतरतील आणि तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला.
advertisement
भाजपातूनच आलेल्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हं आहेत. शिक्षकांच्या नाराजीत भर टाकणाऱ्या या वक्तव्यावर आता पक्षांतर्गतच तणाव वाढण्याची शक्यता आहे. याआधी देखील प्रशांत बंब यांनी शिक्षकांवर टीकास्त्र सोडले होते. शिक्षकांच्या शिक्षणाप्रति असलेल्या प्रतिबद्धतेवर त्यांनी भाष्य केले होते. त्यानंतरही बंब यांच्याविरोधात नाराजी पसरली होती.
>> शिक्षकांचे आंदोलन का झालं?
शालेय शिक्षण विभागाने काढलेला 15 मार्च 2024 चा सरकारचा निर्णय रद्द करावा आणि शिक्षकांसाठी टीईटी (TET Exam) अनिवार्यता केली जाऊ नये, आदी मागण्यांसाठी राज्यातील विविध शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांकडून 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने या आंदोलनावर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर शिक्षण विभागाकडून आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात आले.
