नितीन करडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1963 साली त्यांचे वडील अनंत करडे यांनी परंपरागत दागिने घडवण्याचा व्ययसाय सुरू केला. वडिलांचा वारसा पुढे चालवत नितीन यांनी दागिने घडवण्याच्या व्यवसायाला मोठं स्वरूप प्राप्त करून दिलं. नितीन यांनी घडवलेल्या दागिन्यांना आणि अलंकारांना फक्त देशभरातूनच नव्हे, अमेरिका, मॉरिशस, जर्मनी अशा विविध देशांमधून मोठी मागणी असते.
advertisement
पिंपरी-चिंचवडमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस; पवना धरण फुल्ल, पाण्याची चिंता मिटली, पण धोक्याचा इशारा!
नितीन करडे मागील अनेक वर्षांपासून मानाच्या गणपतीसाठी चांदीचे दागिने घडवण्याचं काम करतात. त्यांनी घडवलेले मुकुट, हार, कंठी, कडे आणि कमरपट्टा अशा विविध अलंकारांमुळे गणेश मूर्तींचं रूप विशेष खुलतं. गणेशोत्सव काळात त्यांच्या दागिन्यांना मानाची गणपती मंडळं आणि इतर मंडळांकडून मोठी मागणी असते. करडे यांच्या दागिने तयार करण्याच्या प्रक्रियेत परंपरागत डिझाईन आणि आधुनिक गोष्टींचा संगम पाहायला मिळतो.
दागिने घडवणे हे अतिशय कौशल्याचं काम आहे. त्यासाठी कारागिराच्या अंगी कलात्मकता, संयम आणि हातोटी लागते. दागिने तयार करण्यापूर्वी त्यांचं डिझाईन निश्चित केलं जातं. त्यानंतर दागिने घडवायाला सुरुवात होते. गेल्या कित्येक वर्षांपासून नितीन करडे निष्णातपणे पुण्यातील अनेक गणपतींसाठी दागिने घडवत आहेत.





