ओरिओ मोदकासाठी लागणारे साहित्य: एक मोठा ओरिओ बिस्कीटचा पुडा, खोबऱ्याचा कीस, दूध, तूप
Food Business: इच्छा तिथे मार्ग, क्लाउड किचनच्या माध्यमातून दिला महिलांना रोजगार
ओरिओ मोदक करण्याची कृती
सर्व प्रथम बिस्किट आणि क्रीम वेगवेगळे करून घ्यावेत. त्यानंतर क्रीममध्ये त्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकावा आणि हे मिश्रण एकजीव करून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. क्रीम काढलेली बिस्किटांची मिक्सरच्या मदतीने पावडर करून घ्यावी. या पावडरमध्ये थोडंसं दूध घालून हे मिश्रण एकजीव करून गोळा बनवा. गोळा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यावर थोडसं तूप लावावं. मोदकाचा साचा घेऊन त्याला तूप लावावे. आता यामध्ये बिस्किटांचा जो गोळा आपण तयार केला होता, त्यातून एक लहान गोळा साच्यामध्ये टाका. त्याला साच्याच्या आतील बाजून दाबून घ्या आणि त्यात क्रीम आणि नारळाच्या किसाचं मिश्रण सारण म्हणून भरा. अशा पद्धतीने आपला मोदक बनून तयार होतो. सर्व मोदक तयार झाल्यानंतर गार्निशिंगसाठी तुम्ही त्याला सिल्व्हर वर्ख देखील लावू शकता. सिल्व्हर वर्ख नसेल तर खोबऱ्याचा कीस परतून घेऊन गार्निशिंगसाठी वापरू शकता.
advertisement
अगदी झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने हे मोदक बनवून तयार होतात. घरच्या घरी हे मोदक बनवून तुम्ही देखील तुमच्या बाप्पाला याचा नैवेद्य दाखवू शकता. बिस्किट असल्यामुळे घरातील लहान मुलं देखील अगदी आवडीने हे मोदक खातील.