रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद पेटला असताना आता या वादात संभाजी ब्रिगेडने उडी घेतली आहे.1 मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा असा अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने हे अल्टिमेटम पाळलं नाही तर 1 मेनंतर संभाजी ब्रिगेड स्वत: रायगडावर जाऊन वाघ्या पुतळा हटवणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिला आहे.
advertisement
संभाजीराजे छत्रपती यांनी जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण राज्य सरकार संभाजी राजे यांच्या भूमिकेबद्दल काय निर्णय घेते? ते पाहणार आहोत. आमची मराठा जोडो यात्रा संपल्यानंतर 1 मेला आम्ही स्वतः पुतळा काढणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देत आहेत. पण त्यांचा पुरावाही आम्हाला मान्य नसून त्यांनी आमच्या सोबत चर्चेला यावं, असं आव्हानही संभाजी ब्रिगेडने संभाजी भिडे यांना दिलं आहे. मराठा सेवा संघाची मराठा जोडो यात्रा धाराशिव जिल्ह्यात आली असून यावेळी सौरभ खेडेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.