भैय्या गायकवाड ऊर्फ गोरख गायकवाड हा इंन्साटाग्राम दुनियेत अचानक हीट झालेला रिलस्टार. समोरच्या व्यक्तीला फोन लावून तोही स्पीकरवर ठेवून, 'हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय, येवला किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष' असं म्हणत या गोरखने मागे लोकांना चांगलंच वेड लावलं होतं. त्याची प्रकृती आणि तो पाहून लोकांनी असंख्य रिल बनवून त्याला मोठं केलं. या स्टाईलमुळे गरिब घरातलं पोरगं रिलस्टार झालं. पण, लाईक आणि फॉलोअर्सची नशा गोरखच्या अंगात भिरली. त्यातून त्याने अनेक वेगवेगळे व्हिडीओ बनवले. यामध्ये कुणाला तरी डिवचणं, थट्टा करणे असे रिल्सही बनवले.
advertisement
काय आहे तो व्हिडीओ?
8 ऑगस्ट २०२५ रोजी भैय्या गायकवाडने एक व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या चेहऱ्याला बँडेज लागलेल्या आहे. या रिलमध्ये तो मला मारहाण झाल्याचा दावा करत आहे.
'रात्री विषय असा झाला की, मला एक ऋषी ब्लॉगर नावाचा आयडी असलेल्या तरुणाचा फोन आला होता. भैय्या तुम्ही सावध राहा, तुम्हाला कुणी तरी मारणार आहे. मारहाण करण्याची धमकी दिली होती. मी रात्री येवल्याच्या सुगीच्या पुलाखालून येत होतो. मला काही पोरांनी पकडलं आणि मारायला लावलं. मला पोरांनी खूप मारलं, पाठीला, तोंडाला मार लागला आहे, असं खुद्द भैय्या गायकवाड सांगतो.
तसंच, मित्रांनो, असं का करताय. मी आजपासून व्हिडीओ काढणे बंद करतो. आजपासून व्हिडीओ काढणार नाही. रामकृष्ण हरी मित्रांनो' असं म्हणत भैया गायकवाडने इंन्स्टाग्रामवरून निरोप घेण्याची घोषणाही करतो.
ऋषी ब्लॉगरने दावा फेटाळला
मात्र, त्याच्या या व्हिडीओवर ऋषी ब्लॉगर नावाचा आयडीने एक दोन जणांनी कमेंट केली आहे. हा सगळा पब्लिक स्टंट आहे, आम्ही कधीच तुला असं मारायला सांगितलं नाही. तुझे व्हिडीओ पाहून लोक आम्हाला त्रास देताय, असं या ऋषीचं म्हणणं आहे.
टोलनाक्यावरील मारहाण खरी की खोटी?
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर सावंगी टोलनाकावर भैय्या गायकवाडला ९ ऑक्टोबरला मारहाण झाली. कारवर फास्ट टॅग नव्हता. त्यामुळे टोलसाठी शिल्लक पैसे द्यावे लागणार होते. यावरून भैय्या गायकवाड गाडीतून खाली उतरला. टोल कर्मचाऱ्यांशी आपल्या स्टाईलमध्ये बोलण्यास सुरुवात केली. बघता बघता टोल कर्मचारी आणि भैय्या गायकवाडमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम चोप दिला.
पण, भैय्या गायकवाडचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्याामध्ये तो काही लोकांना धमकी देत आहे. पाठलाग करून तुम्ही मारहाण केली, आता तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकीच त्याने दिली आहे. त्यामुळे टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती की दुसरं कुणी होतं, असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. कारण, या प्रकरणी पोलिसांमध्ये कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक युझर्स हे प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याचा संशय घेत आहे.