अबू आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचं कारणसुद्धा सांगितलं आहे. समाजवादी पार्टी हा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर चालणार आहे. तर शिवसेना हा कम्युनल विचारसरणीचा आहे. त्यांच्या धर्मांध विचारांसोबत जाणं शक्य नसून आम्ही बाहेर पडत आहोत असं अबू आझमी यांनी सांगितलं.
धार्मिक कट्टरतावाद्यांशी लढण्यासाठी आम्ही मविआसोबत होतो. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कट्टरतावादी वक्तव्ये केली. तसंच जागावाटपापासून मविआने आमच्यासोबत चर्चा केली नाही. बाबरी मशिद पाडणाऱ्यांचं अभिनंदन करणारे आणि अभिमान वाटतो म्हणणाऱ्यांसोबत आम्हाला रहायचं नसल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं.
advertisement
शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यास सांगितलं जात आहे. तसंच बाबरी मशिद पाडणाऱ्यांचं अभिनंदन करणाऱ्यांसोबत समाजवादी पार्टी कधीच राहू शकत नाही असं अबू आझमी यांनी सांगितलं. शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी ६ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर बाबरी मशिदीसंदर्भात पोस्ट केली होती. ज्यांनी बाबरी पाडली त्यांचा मला अभिमान आहे असं शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य असलेलं पोस्टर त्यांनी शेअर केलं होतं.
मविआतून बाहेर पडण्याबाबत अखिलेश यादव यांच्या सचिवांशी माझी चर्चा झाली. मी आणि रईस शेख यांचं मविआसोबत न राहण्यावर माझं एकमत आहे. आम्हाला शिवसेनेचं धर्मांध राजकारण कधीच पटलं नाही. सपाचे आम्ही दोन आमदार स्वतंत्र बसू असं अबू आझमी यांनी स्पष्ट सांगितलं.