मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर महामार्गावरील कासेगाव येथे बनावट नोटांची तस्करी सूरू असल्याची माहिती पोलिसांना खास सुत्रांकडून मिळाली होती.आरोपी एका सफेद इनोव्हा गाडीतून नोटांची तस्करी करत होते. याबाबतची माहिती मिळताच मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी 500 आणि 200 रुपयांच्या 99 लाख 23 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.यासोबत नोटा बनवण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. या नोटा वाहतूकीसाठी सफेद कलरची इनोव्हा गाडी विना नंबरप्लेटची गाडी असा मिळून 1 कोटी 11 लाख सहाशे रुपयांच्या बनावट नोटांचा साठा मुद्दे माल सहित जप्त केले होते.
advertisement
मुंबईकडे या नोटांची तस्करी सुरू होती. त्या दरम्यान पोलिसांनी कारवाई करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या सगळ्या नोटांची छपाई कोल्हापूर शहरातील एका चहाच्या कंपनी मध्ये सुरू होती.त्यानंतर कोल्हापूर येथून महाराष्ट्रच्या विविध भागात बनावट नोटांच वितरण सुरू व्हायचं.अशाप्रकारे या नोटांची तस्करी विविध जिल्ह्यात व्हायची.
पोलिसांनी या प्रकरणात अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत 5 जणांना अटक केली आहे.यामधील 4 जण कोल्हापूरचे आहेत तर एक जण मुंबईचा आहे. कोल्हापूरमधील 4 आरोपींमधील एका पोलीस (मोटार परिवहन विभाग) कर्मचाऱ्याचा ही समावेश आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
99 लाख 23 हजार 300 अशा 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. यासोबत नोटा बनवण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. या नोटा वाहतूकीसाठी सफेद कलरची इनोव्हा गाडी विना नंबरप्लेटची गाडी असा मिळून 1 कोटी 11 लाख सहाशे रुपयांच्या बनावट नोटांचा साठा मुद्दे माल सहित जप्त केले होते. या प्रकरणात5 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी सुनावली आहे.4 आरोपी कोल्हापूर जिह्याचे आहेत आणि एक आरोपी मुंबईचा आहे,अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी दिली आहे.