TRENDING:

Sangli Crime News: म्हणून त्याचा आम्ही 'गेम' केला; सांगलीतील आरटीआय कार्यकर्त्याच्या खुनाचा उलघडा

Last Updated:

Sangli Crime News: संतोष कदम हा सांगली महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार होता. त्याची परवानगी घेण्यासाठी तो सांगली शहर पोलीस ठाण्यात गेला होता. त्याचवेळी त्याला शिरोळ तालुक्यातील आलास येथील मातीच्या औटीवरून एकाचा फोन आला...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली, 09 फेब्रुवारी : सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याने नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखो रूपयांची फसवणूक केल्यानेच त्याचा 'गेम' झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. संतोष याच्या खुनात सांगलीतील एकूण तिघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले असून त्यातील दोन संशयितांना कुरूंदवाडचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
News18
News18
advertisement

पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित सांगलीतील प्रशिक चौक परिसरात संतोष कदम याच्या घराजवळच राहतात. तीन संशयितांपैकी दोघेजण सांगलीवाडी येथील वीट भट्टीवर काम करतात. संतोष कदम हा सांगली महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार होता. त्याची परवानगी घेण्यासाठी तो सांगली शहर पोलीस ठाण्यात गेला होता. त्याचवेळी त्याला शिरोळ तालुक्यातील आलास येथील मातीच्या औटीवरून एकाचा फोन आला. त्यानंतर घरात कुरूंदवाडला जाऊन येतो असे सांगून बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बाहेर पडला होता.

advertisement

रात्रभर तो परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी सांगली शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. गुरुवारी दुपारी त्याच्याच स्विफ्ट कारमध्ये (एमएच 09 बीबी 0806) कुरूंदवाड-नांदणी रस्त्यावर त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर कुरूंदवाड पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली होती. त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तसेच लोकेशन मिळाल्यानंतर तपासाला गती मिळाली. कुरूंदवाड पोलिसांनी आलास येथील औटीवरील एका जेसीबी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर सहायक निरीक्षक श्री. फडणीस यांच्या पथकाने सांगलीवाडीतील वीट भट्टीवर काम करणाऱ्या सांगलीतील दोघांना ताब्यात घेतले. या खुनातील एक संशयित अद्याप पसार आहे.

advertisement

...तर वाचले असते अभिषेक घोसाळकर; मिळाला होता धोक्याचा इशारा

ताब्यात घेतलेल्या दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नोकरी लावण्यासाठी संतोषने लाखो रूपये घेतले होते. तरीही तो नोकरी लावत नव्हता तसेच पैसेही परत देत नव्हता, त्यामुळेच त्याचा चाकूने भोसकून खून केल्याचे त्यांनी सांगितले. तरीही पोलीस या खुनाचे नेमके कारण शोधण्यासाठी कसून चौकशी करत आहेत. लवकरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान संतोष कदम याच्यावर खंडणी, शासकीय कामात अडथळा आणणे आणि विनयभंगाचे असे एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

advertisement

अटक झालेल्याचा सूड की राजकीय वैर; मॉरिस आणि अभिषेक यांच्यात नेमका कोणता वाद?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

नितेश वराळे आणि सुरज जाधव (राहणार गावभाग सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Crime News: म्हणून त्याचा आम्ही 'गेम' केला; सांगलीतील आरटीआय कार्यकर्त्याच्या खुनाचा उलघडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल