गायकवाडांना सुनावले खडे बोल...
आमदार संजय गायकवाड यांच्यात पक्षातील आमदारांनी खडे बोल सोनावलेले आहेत. प्रत्येक विषय हा हाताळण्याची एक वेगळी पद्धत असते जो प्रकार घडला त्याबद्दल तक्रार करता आली असती आणि विषय वेगळ्या पद्धतीने मांडता आला असता तक्रार करून कॅन्टीन आल्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करता आले असतील पण अशा रीतीने मारहाण करण एका आमदाराला शोभत नाही संजय गायकवाड यांनी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे होतं असा घरचा आहेर शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना दिला आहे.
advertisement
मारहाण का केली, याचा विचार करा...
तर आमदार संजय गायकवाड यांचा परा का चढला? त्यांचं रागावरचं नियंत्रण का गेलं? त्यांनी अशी मारहाण का केली एखादा आमदाराचा असा तोल का जातो याचाही विचार झाला पाहिजे असे मत राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. आमदार गायकवाड यांची बाजू समजून घेणं आवश्यक आहे. पण, त्यांनी मारहाण करणं चुकीचं असल्याचे मत देसाई यांनी व्यक्त केले. आम्ही आमदार संजय गायकवाड यांच्याशी चर्चा करून गरज पडल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील चर्चा करू तो ठेकेदार काय करतो काय देतो याबाबत देखील गोष्टी समोर येतील, असे देसाई यांनी म्हटले.
हा सत्ताधाऱ्यांचा माज, विरोधकांची टीका...
तर विरोधकांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली असून हा सत्ताधाऱ्यांचा माज असल्याची जळजळीत टीका विरोधकांनी केली आहे. आमदार इथे असं वागत असतील तर ते त्यांच्या मतदारसंघात आणि त्यांचे कार्यकर्ते कसे वागत असतील, असा प्रश्न पडत असून हा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटले. तुम्हाला गरीब माणसाला मारायला सत्तेत पाठवला आहे का या मारहाणीचा मी निषेध करतो असं काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी म्हटले.
गायकवाड म्हणतात, सभागृहात मीच मुद्दा मांडणार...
कॅन्टीन विषयी मी अन्न औषध प्रशासन विभागाशी बोललो. मी तक्रार केली आहे तसेच मंत्री नरहरी झिरवळ यांना देखील याची मी कल्पना दिलेली आहे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न हा प्रश्न मी विधानसभेत देखील उपस्थित करणार आहे, असं आमदार संजय गायकवाड यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले आहे...