TRENDING:

Sanjay Raut On BJP : राऊतांनी 'त्या' नेत्यांचा क्लायमॅक्स सांगितला, भाजपने पक्ष प्रवेशाची स्क्रिप्टच बदलली!

Last Updated:

Sanjay Raut On BJP : ठाकरे गटाचे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट ट्वीट करत भाजपच्या पक्ष प्रवेश सोहळ्यावर टीका केल्यानंतर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक: नाशिक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असून शिवसेना ठाकरे गटाला आज मोठं खिंडार पडणार होतं. मात्र, ठाकरे गटाचे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट ट्वीट करत भाजपच्या पक्ष प्रवेश सोहळ्यावर टीका केल्यानंतर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे.
राऊतांनी 'त्या' नेत्यांचा क्लायमॅक्स सांगितला, भाजपने पक्ष प्रवेशाची स्क्रिप्ट बदलली!
राऊतांनी 'त्या' नेत्यांचा क्लायमॅक्स सांगितला, भाजपने पक्ष प्रवेशाची स्क्रिप्ट बदलली!
advertisement

ठाकरे गटाला मोठा धक्का देत नव्याने नियुक्त करण्यात आलेले महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यासह माजी उपनेते सुनील बागुल, नगरसेवक प्रशांत दिवे, सीमा ताजने, सचिन मराठे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार गणेश गीते हे थेट भाजपमध्ये दाखल होत आहेत. गीते यांच्यासोबत नगरसेवक कमलेश बोडके यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार होता. सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या पक्ष प्रवेशाला आता भाजपने ब्रेक लावला असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. अवघ्या काही दिवसांपूर्वीच मामा राजवाडे यांची ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. कालच नाशिक शहरात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.

advertisement

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये काय म्हटले?

संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये भाजपवर टीका केली. त्यांनी म्हटले की, नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

advertisement

advertisement

आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणारे बागुल आणि राजवाडे या दोघांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू आहे. एकीकडे पोलीस त्यांचा शोध घेत असताना दुसरीकडे आज ते भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्या दाऊदला देखील भाजपात प्रवेश दिला जाईल असेही राऊत यांनी म्हटले.

राऊतांच्या ट्वीटचा धसका, भाजपने उचललं पाऊल...

संजय राऊत यांनी बोचरा वार केल्यानंतर आता भाजपने सावध भूमिका घेतली आहे. राऊत यांच्या टीकेचा धसका घेतल्यानंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लावण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इतर संबंधित बातमी:

Nashik News : काल खंडणीचा गुन्हा अन् आज भाजपात प्रवेश, नाशिकच्या राजकारणात उलथापालथ

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut On BJP : राऊतांनी 'त्या' नेत्यांचा क्लायमॅक्स सांगितला, भाजपने पक्ष प्रवेशाची स्क्रिप्टच बदलली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल