Nashik News : काल खंडणीचा गुन्हा अन् आज भाजपात प्रवेश, नाशिकच्या राजकारणात उलथापालथ
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
Nashik News : नाशिक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असून शिवसेना ठाकरे गटाला सुरू असलेली गळती कायम आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक: आजचा दिवस नाशिकच्या राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरणार आहे. नाशिक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असून शिवसेना ठाकरे गटाला सुरू असलेली गळती कायम आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, विलास शिंदे यांनी भाजप आणि शिंदे गटात शक्तिप्रदर्शन करत प्रवेश केला. मात्र, त्यापूर्वीच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, यामुळे शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला होता.
ठाकरे गटाला मोठा धक्का देत नव्याने नियुक्त करण्यात आलेले महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यासह माजी उपनेते सुनील बागुल, नगरसेवक प्रशांत दिवे, सीमा ताजने, सचिन मराठे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार गणेश गीते हे थेट भाजपमध्ये दाखल होत आहेत. गीते यांच्यासोबत नगरसेवक कमलेश बोडके यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
advertisement
हे सगळेच नेते आणि नगरसेवक आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात सामील होत असून, त्यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच मामा राजवाडे यांची ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. ही नेमणूक आता निष्फळ ठरली आहे.
काल खंडणीचा गुन्हा आज भाजपात प्रवेश...
advertisement
याशिवाय, कालच नाशिक शहरात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. एकीकडे, विरोधी पक्षांकडून भाजपवर गुन्हेगारांना सामावून घेतल्याचे आरोप होत आहेत. भाजपने काही वर्षांआधी सुधाकर बडगुजर यांच्यावरही मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचे आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच बडगुजर यांचा भाजपात प्रवेश झाला. या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक पातळीवरून विरोध झाला होता.
advertisement
नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा फटका बसला असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी हे समीकरण नक्कीच बदलणारे ठरणार आहे.
आज कोण करणार भाजपात प्रवेश?
> सुनिल बागुल ( शिवसेना उपनेते, उबाठा )
> मामा राजवाड़े ( महानगर प्रमुख, उबाठा )
> गणेश गीते ( माजी स्थायी समिति सभापती )
> सचिन मराठे (उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, उबाठा )
advertisement
> प्रशांत दिवे ( माजी नागरसेवक, उबाठा )
> सिमा ताजने ( माजी नगरसेविका,उबाठा )
> कमलेश बोडके ( माजी नगरसेवक )
> बाळासाहेब पाठक ( जिल्हा संघटक, उबाठा )
> गुलाब भोये ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
> कन्नु ताजने ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )
> शंभु बागुल ( युवसेना विस्तारक, उबाठा )
advertisement
> अजय बागुल ( श्रमिक सेना जिल्हा प्रमुख )
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
July 03, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik News : काल खंडणीचा गुन्हा अन् आज भाजपात प्रवेश, नाशिकच्या राजकारणात उलथापालथ