मात्र वाल्मीक कराडने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याची बाब फेटाळून लावली आहे. शिवाय या प्रकरणातून आपल्याला मुक्त करावं, अशी डिस्चार्ज याचिका देखील त्याने कोर्टात दाखल केली आहे. आज वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज याचिकेवर युक्तिवाद होणार आहे. या युक्तीवादावर वाल्मीक कराडचं पुढचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे कोर्टात वाल्मीकचा वकील नक्की काय युक्तीवाद करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे वाल्मीक कराड संतोष देशमुख प्रकरणातून सुटणार का? असा प्रश्नही विचारला जातोय.
advertisement
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनवर सरकारी वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर वाल्मीकच्या वकिलांकडून देखील युक्तिवाद होईल. याशिवाय विष्णू चाटे याने बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आणण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर देखील आज निर्णय होणार आहे.
आरोपींच्या डिस्चार्ज याचिकेवर संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मूळ फिर्यादी असलेल्या शिवराज देशमुख यांचे म्हणणे न्यायालयाने मागितले आहे. शिवराज देशमुख यांना मागच्या तारखेला नोटीस मिळाली नव्हती. आता नोटीस मिळाली असेल तर त्यांचं म्हणणे कोर्टात मांडलं जाऊ शकतं. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. तसेच धनंजय देशमुख हे देखील सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहणार आहेत.