सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत माध्यमातून कृषी दिन ते जागतिक संवर्धन दिनापर्यंत वृक्षारोपण मोहीम जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक, एनजीओ, शालेय विद्यार्थी यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. वाई तालुक्यातील अनवडी गावाच्या परिसरात सुमारे 500 वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याचे नियोजन वाई तालुका महसूल विभाग अनवडी गावातील ग्रामस्थ यांनी केला आहे. 500 झाडे लावून ती सर्व मोठे होत नाही तोपर्यंत त्याचे संगोपन करणार असल्याचेही यावेळी वाई तालुका प्रांताधिकारी राजेश जाधव यांनी सांगितले.
advertisement
प्रांत अधिकारी वाई यांच्या वतीने गावाच्या सीमेतील सार्वजनिक जागेवर किमान 500 झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे देशी प्रजातीची आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार चांगल्या वाढीला अनुकूल आहेत. गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर ग्रामपंचायत मधील सदस्य, प्रांताधिकारी, नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी, आदी सरकारी अधिकारी, महसूल विभाग कर्मचारी यांनी मिळून या झाडाचे संगोपन आणि पालन करणार आहेत. झाडांच्या दीर्घकाळ संवर्धनाची जबाबदारी ग्रामपंचायतवर त्याचबरोबर ग्रामस्थांवर राहणार आहे.
वृक्ष लागवड मोहिमेत वाई तालुक्याचे तहसीलदार आणि अनवडी परिसरातील सर्कल तलाठी यांचा मोलाचा वाटा असल्याचे देखील ग्रामस्थांनी सांगितले. वाईतील महसूल विभागाकडून 500 झाडांची लागवड केली असली तरी यापुढील काळात आणखी वृक्ष लागवड करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी म्हटले की, वृक्षांची तोड ज्या प्रमाणात होते, त्या प्रमाणात आपण लागवड करत नाही. एका मोठे वृक्ष वाढायला अनेक वर्ष लागतात. पण मोठा वृक्ष तोडायला किती वेळ लागतो. आपल्याला सांगायची गरज नाही. पण त्या प्रमाणात लागवड व्हायला पाहिजे, ती होत नाही, हे ही तितकेच खरे आहे. म्हणून तर शासनाने एकच लक्ष 15 कोटी वृक्ष म्हणून एक मोहीम सुरू केली आहे.
दुष्काळी स्थितीमुळे मेंढपाळांच्या जीवनात भटकंती, पोटाची खळगी भरण्यासाठीची ही संघर्षमय कहाणी!
एका भौगोलिक प्रदेशावर 33% कव्हरेज वनांचा आच्छादन असावा, असा नियम आहे. आपल्या महाराष्ट्राचे प्रमाण 20% आहे. कदाचित 15% जे शिल्लक आहे, ते गाठायला खूप वर्षे लागतील. पण त्याची सुरुवात म्हणून आज आम्ही इथे आमच्या महसूल विभागामार्फत, स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे. एकूण 500 खड्ड्यांवर आम्ही वृक्ष लागवड केली आहे. ज्या वृक्षांची निवड केली ती इंडीजिनियस लोकल, हार्डी नेचरची झाडं आहेत. त्यांनी ही निवडलेल्या झाडांच्या प्रजाती या स्थानिक असल्याने मला जास्त आनंद आहे. यामध्ये वड, पिंपळ, करंज, साग यांसारखे अनेक प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.





