सातारा : सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच साताऱ्यात छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये अनेक पुरातन वस्तू, शस्त्रास्त्र साठा करण्यात आला आहे. याच साठ्यामध्ये एक अनोखे शस्त्र आहे. हे शस्त्र अठराव्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. या शस्त्राची उंची 12 फूट आहे. हे शस्त्र चालवताना दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून चालवावा लागते.
advertisement
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणे, अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली आहे. मात्र, या म्हणीप्रमाणे कोणती बंदूक अशी असते का? अशी बंदूक तुम्ही पाहिली आहे का?, ती दिसायला कशी आहे, तिचं वजन किती आहे, ती कोणत्या काळातील आहे, असे प्रश्न अनेकांना पडतात. तर याचबाबत लोकल18 च्या टीमने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात बंदुकीचे दालन तयार करण्यात आले आहे. या संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या शतकातल्या 100 बंदुका आहेत. यामध्ये काही ठासनीच्या बंदुका आहेत. गोळी असणाऱ्या बंदुका अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका आहेत.
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता गोदावरी नदीतही घेता येणार क्रूझचा आनंद
यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वांच्या आकर्षण ठरलेल्या चार बंदुका आहेत. गेल्या अनेक वर्षापासून एक म्हण प्रचलित आहे. ही म्हण म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणे. अशा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याच्या चार बंदुका साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात संग्रहित करण्यात आल्या आहेत. या बंदुका साधारणतः अठराव्या शतकातील आहेत. या बंदुका पाहण्यासाठी पर्यटकांचा आणि शिवप्रेमींचा प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो.
दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून बंदूक चालवणे, ही म्हण अनेक काळापासून फक्त ऐकली होती. मात्र, आता प्रत्यक्षात साताऱ्यातील संग्रहालयात ही बंदूक पाहायला मिळत आहे. रोज हजारो पर्यटक, नागरिक या बंदूका पाहायला याठिकाणी येत आहेत.
या चार बंदुकीतील काही बंदुकांचे नाव पुढीलप्रमाणे -
फटाकडी, उंटावरील बुस्टर नळा, जमिनीवर चालणारी बंदूक, अशा प्रकारच्या या बंदुकांची नावे आहेत. या बंदुकांचे वजन हे खूप जास्त असते. एक एक बंदूक वापरण्यासाठी चार लोक लागतील, इतक्या या बंदुकांचे वजन आहे. या बंदुकांची उंची 10 ते 12 फूट आहे, अशी माहितीही प्रवीण शिंदे यांनी दिली.





