सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. महाराष्ट्रासह देशभरातून शिवप्रेमी या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येत असतात. शिवभक्त अनेक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपापल्या परीने मानवंदना देत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना एक हटके मानवंदना देण्याचा मानस कोल्हापूरची रणरागिनी, आंतरराष्ट्रीय धावपटू आसमा कुरणे हिने केला आहे. कोल्हापूर ते रायगड असा 300 किलोमीटर धावत जाण्याचा निश्चय 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त केला आहे.
advertisement
जिद्दीला सातारकरांनी केला सलाम
1 जूनलां कोल्हापूरपासून तिने धावण्यास सुरुवात केली. कोल्हापूर ते कराडपर्यंत 75 किलोमीटरचे अंतर तिने एका दिवसात पूर्ण केले आहे. त्यानंतर 2 तारखेला ती कराड ते सातारा असे 55 किलोमीटरच्या अंतर पूर्ण करून ती मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात दाखल झाली. साताऱ्यातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे. साताऱ्यात पोहोचल्यानंतर शिवभक्तांनी आणि सातारकरांनी तिला सातारी फेटाबांधून अन् सातारी कंदी पेढा चारून तिचा सत्कार देखील करण्यात आला आहे. तिच्या या जिद्दीला सातारकरांनी सलाम केला आहे.
दहावीनंतर बनवली पहिली भन्नाट बाईक, कोल्हापूरच्या तरुणाचा अनोखा STUDIO, काय आहे खास?
धावण्यासाठी यांनी केली मदत
छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती संयोगिता राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कोल्हापूर ते रायगड असा 300 किलोमीटरचा धावण्याचा प्रवास सुरू केला. रायगड समितीच्या अध्यक्षा संयोगिता राजे छत्रपती यांचा मार्गदर्शन आणि त्यांनी वेळोवेळी केलेली मदत यामुळेच मी 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करू शकते, असं मत धावपटू आसमा कुरणे हिने व्यक्त केले.
कलेने ओलांडल्या सीमेच्या भिंती, मराठी कलाकाराची मोठी झेप, थेट चीनमध्ये होणार चित्र प्रदर्शन
कोल्हापूरची कन्या, ताराराणीची लेक, छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत जन्मल्याचा मला खूप अभिमान आहे. या हिमतीवरचं कोल्हापूर ते रायगड पर्यंतचा प्रवास मी धावत करणार असल्याचे देखील आसमा कुरणे हिने सांगितलं आहे.
या पूर्वी अनेक मॅरेथॉन आसमा कुरणे धावली आहे. लडाख, थायलंड, कारगिल यासारख्या अनेक ठिकाणी धावली आहे. आसमाने मागील वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी 100 किलोमीटर धावून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिले होती. यावेळी आसमा कुरणे 300 किलोमीटर धावण्याचा निश्चय केला आहे.
अस्सल रानमेव्याची चव चाखावी तर इथंच, देवीच्या दर्शनानंतर लगेच घ्या रानमेव्याचा आस्वाद
कोल्हापूर ते रायगड धावण्याचा अनुभव कसा आहे?
कोल्हापूर ते रायगड धावत असताना रखरख्त ऊन असल्याने डीहायड्रेशन बॉडीमध्ये होत आहे. पायाचे कातडे उन्हाच्या झळामुळे गेले आहेत. त्याचबरोबर पायाला फोड येऊन त्यामध्ये पाणी देखील झाले आहे. उन्हात पळाल्यामुळे पायाला गोळे देखील येत आहेत. त्याचबरोबर घशाला देखील फोड आले आहेत त्यामुळे पाणी देखील पिता येत नसल्याचे आसमा कुरणे सांगितलं. मात्र आपल्या राजाला हे अनोखी 300 किलोमीटर धावून मानवंदना देण्यासाठीचा प्रयत्न असल्याने ती धावणार आणि पाच तारखेपर्यंत हा तीनशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार असल्याचे देखील तिने सांगितलं आहे. उन्हामुळे होणाऱ्या त्रासाला न हरता तिने यावर देखील पर्याय काढला आहे ती आजपासून संध्याकाळी धावण्यास सुरुवात करणार आहे, असे देखील तिने सांगितलं आहे.