TRENDING:

Shahapur News : आधी शिविगाळ केली, मग दुकानदाराने सामानाच मापच डोक्यात घातलं, मुंबई कल्याणनंतर शहापूरमध्ये परप्रांतीयाची मुजोरी

Last Updated:

मराठी माणसाला शिविगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे.या मारहाणीत ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. गणपत गोरे असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shop Helper beat Marathi Rickshaw Driver : मुंबईसह कल्याण डोंबिवली परिसरात परप्रांतीयांनी मुजोरी केल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत.अशीच घटना आता शहापूरमध्ये घडली आहे.या घटनेत मराठी रिक्षाचालकाचा दुकानात काम करणाऱ्या मजूरामध्ये वाद झाला होता.या वादातून मजूराने मराठी माणसाला शिविगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे.या मारहाणीत ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. गणपत गोरे असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Shahapur News
Shahapur News
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आसनगावमध्ये राहणारे गणपत गोरे हे रिक्षाचालकाच काम करतात. आज गणपत गोरे हे शहापूर मधील पटेल किराणा दुकानात सामान घ्यायला गेले होते. दुकानातून सामान घेतल्यानंतर त्यांनी ते सामान रिक्षात टाकूण देण्यास दुकानदाराला सांगितलं होतं. त्यानुसार दुकानदाराने आपल्या मजुराला सामान रिक्षात टाकायला सांगितलं.त्यानुसार मजूराने सामना रिक्षात टाकले. पण हे सामान रिक्षात टाकल्यानंतर अस्थव्यस्थ झालं होतं.त्यामुळे गोरे यांनी मजूराला सामान नीट ठेवण्याची विनंती केली.

advertisement

पण या दरम्यानच गणपत गोरे आणि मजूरामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीत मजूराने गणपत यांना शिविगाळ केली होती.या शिविगाळाचा जाब विचारायला गेलेल्या गणपत गोरे यांच्यावर नंतर मजूराने सामान भरण्याच माप डोक्यात मारलं होतं.त्यामुळे गोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखाप झाली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यावेळी उपचाराअंती गणपत गोरे यांच्या डोक्याला 7 ते 8 टाके पडल्याची माहिती आहे.

advertisement

या घटनेनंतर शहापूर पोलिस स्टेशन समोर मराठी युवकांची मोठी गर्दी करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. या मागणीनंतर गणपत गोरे यांच्या तक्रारीवरून आरोपी राजस्थानी मजूर चिमणराव चौधरी याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिकचा तपास शहापूर पोलिस करत आहेत.

दरम्यान परप्रांतीयांची दादागिरी आधी मुंबईमध्ये पाहायला मिळाली होती.त्यानंतर हेच लोण कल्याण डोंबिवली पर्यंत परसले होते. आता अशीच घटना थेट शहापूरमध्ये घडली आहे. या घटनेने नागरीकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shahapur News : आधी शिविगाळ केली, मग दुकानदाराने सामानाच मापच डोक्यात घातलं, मुंबई कल्याणनंतर शहापूरमध्ये परप्रांतीयाची मुजोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल