सिंधुदुर्ग : जीवन आनंद या सामाजिक संस्थेमार्फत कुडाळ येथील पणदूर येथे सविता आश्रम चालविला जातो. समाजातील असहाय्य, निराधार, मतिमंद अशा समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी तो एक भक्कम आधार ठरला आहे. राजाश्रयविना केवळ लोकाश्रयावर ही संस्था खऱ्या अर्थाने चालविली जाते. समाजाने टाकून दिलेल्या अशा असंख्य बेवारस माणसांचा सविता आश्रम हाच कायमस्वरूपी आधार झाला आहे.
advertisement
सविता आश्रममध्ये लहान मुलं आहेत, तरुण-तरुणी आहेत. तसेच वृद्ध महिला आणि पुरुषही आहेत. धडधाकट असलेले मतिमंद ही आहेत. बेवारस स्थितीत रस्त्याच्या कडेला पडलेले, टाकून दिलेले, वृद्ध झाल्याने हतबल झालेले, रेल्वे मार्गाजवळ पडलेले अशा तब्बल 175 जणांना आश्रमाने आधार दिला आहे. संदीप परब नावाच्या कोकणातल्या तरुणांनी जीवन आनंद या संस्थेच्या माध्यमातून हा आधार निर्माण केला आहे.
वय अवघं 7 आणि सुवर्णपदकांचं शतक, पुण्यातल्या लेकीची प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी कामगिरी
या संस्थेचे काम वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे. मुंबईत खार इथे डे केअर सेंटर चालविला जात. तिथे रस्त्यावरच्या बेवारसांची औषधोपचारा सह दिवसभराची व्यवस्था केली जाते. रस्त्यालगतच्या रुग्णांना सेवा देणे, उपचार करणे, स्वच्छ करणे, अंघोळ घालणे, गंभीर आजाराला त्रस्त असलेल्यांना रुग्णालयात दाखल करणे, निराधारांना मानसिक आधार देणे अशा स्वरूपाचे हे काम आहे. रुग्णांना मानसिक अवस्थेविषयी माहिती देणे, रुग्णांचा पूर्व इतिहास शोधून काढणे, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधन. त्यांना त्यांच्या ताब्यात देणे. तसेच निराधार रुग्णांचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम ही संस्था करते.
सविता आश्रममध्ये दरवर्षी सरासरी ते 50 गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचाराची सुविधा संस्थेमार्फत पुरविली जाते. संस्था बेवारस आणि निराधारांसाठी काम करते. प्रामुख्याने त्यांच्याकडे जीवन कंठणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांविषयी फोन येतात. आल्यानंतर सध्या प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका चमू सह संस्थेला देणगी रूपाने मिळालेल्या रुग्णवाहिकेसह ठिकाणी रवाना होते. शक्य असेल तिथे अशा एकाकी पडलेल्या वृद्धांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जात. सात वर्षात संस्थेने सुमारे दीड हजार ज्येष्ठ नागरिकांचे यशस्वीरित्या पुनर्वसन केले आहे. ज्यांना कुटुंबच नाही अशा जगण्याची उमेदच गमावलेल्या असाहाय्य, अनाथ, मनोरुग्ण, अपंग आणि निराधार मुलांना आणि प्रौढांना कायम स्वरूपाची राहण्याची व्यवस्था केली आहे.