सोलापूर: बार्शी तालुक्यात गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण मिळताना पाहायला मिळत आहे. गोविंद बर्गे यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाला आहे नातेवाईकांचा आरोप केला आहे. जो व्यक्ती आयुष्यात काठी कधी सोबत ठेवू शकत नाही तो बंदूक कशी सोबत ठेवेल असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.
आम्ही गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शी पाहिलं की गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती. सदर नर्तिकेने गोविंद बर्गेची अनेक वेळा आर्थिक फसवणूक केली आहे.मगेवराईतील घर नावावर करण्यासाठी ब्लॅकमेल ही नर्तिका करत होती. त्याला तिच्या गावात बोलवून त्याचा घातपात केला. त्यामुळे ही आत्महत्या नाही हा घातपात आहे, असा आरोप गोविंद बर्गे याच्या नातेवाईकांनी केला आहे.
advertisement
घर आणि जमीन नावावर करण्यासाठी तगादा
वैराग जवळ गोविंद बर्गे यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. घर आणि जमीन नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. जमीन नावावर करून दिली नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची गोविंद बर्गे यांना दिली होती. याचा अधिक तपास वैराग पोलीस ठाणे करत आहे.
काय आहे प्रकरण?
पूजा आणि गोविंद बर्गे यांच्यात दीड वर्षांपूर्वी ओळख झाली होती. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसापासून संपर्कात नसल्यामुळे गोविंद हा पुजाच्या घरासमोर आला होता. नर्तिकाच्या घरासमोरच गाडीमध्ये ड्रायव्हर सीटला बसून पिस्तूल मधून गोळी गोविंदने उजव्या कपाळातून डाव्या बाजूला फायर करून घेतली. यात गोविंदा जागीच मृत्यू झाला गोविंदचे पुजावर प्रेम असल्यामुळे त्याने तिला सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मोबाईलही दिला होता. पुजा गोविंदजवळ घर नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोविंद हा विवाहित होता त्याला एक नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा होता. याप्रकरणी पूजा गायकवाड हिला वैराग पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा :