सोलापूर: भारतीय पोषाखात टोपी हे पारंपरिक वस्त्र मानले जाते. गरजेनुसार आणि ऋतुमानानुसार प्रत्येकजण टोपी खरेदी करत असतो. उन्हाळा सुरू झाला की हमखास टोपीची आठवण होते. उन्हापासून बचावासाठी टोपी खरेदी केली जाते. पण ही खरेदी करताना आपली आवड आणि स्टाईल जपण्याचाही प्रयत्न होत असतो. एप्रिल सुरू होताच सोलापुरात सूर्य आग ओकू लागतो. त्यामुळे सोलापूरकर टोपीवाल्याच्या स्टॉलवर थांबतातच. यंदाही बाजारात अनेक प्रकारच्या टोपी आल्या असून त्यांना मोठी मागणी आहे.
advertisement
नवी पेठेत टोप्यांचे स्टॉल
सोलापुरात नवी पेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. या ठिकाणी सिझनल कपडेही मिळतात. आता उन्हाळा सुरू असून सोलापूरच्या तापामानाने 40 अंशांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे नवी पेठेत टोप्यांचे स्टॉल दिसत आहेत. या स्टॉलवर अनेक व्हरायटीच्या रंगीबेरंगी टोप्या उपलब्ध असल्याने टोप्यांच्या स्टॉलवर गर्दी होताना दिसत आहे.
ना कागद, ना डायरी; दुधाचा हिशोब आता एका क्लिकवर, इंजिनिअर तरुणांनी बनवलं खास ॲप, Video
टोप्यांचे विविध प्रकार
उन्हापासून बचावासाठी बाजारपेठेत अनेक प्रकारच्या टोप्या पाहायला मिळतील. वाढत्या उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी उन्हाळी टोपी खरेदी केली जाते. कॉटन टोपी, जीन्स टोपी, टोपी, स्पंज टोपी, क्लासिक टोपी, मिलिट्री टोपी, फ्लेक्झी टोपी, देवानंद टोपी, केजीएफ टोपी अशा अनेक प्रकारच्या टोपी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच बाजारपेठांमध्ये लहान मुलांच्या टोप्यांचेही अनेक खास प्रकार आहेत. यात मुलांना आवडणाऱ्या व आकर्षित करणाऱ्या टोपी उपलब्ध झाल्या आहेत. छोटा भीम टोपी, बार्बी टोपी, कार्टूनचे डिझाईन असलेल्या टोपीही याठिकाणी मिळतात.
कोणत्या टोप्यांना मागणी?
टोप्यांची मागणी ही सिझनल असते. प्रत्येक ऋतूनुसार टोपी खरेदी केली जाते. सध्या उन्हाळा असल्याने उन्हापासून बचाव करणाऱ्या टोपींना मागणी आहे. ज्येष्ठ नागरिक गांधी टोपी वापरतात. सध्या उन्हाळ्यात पांढरी, लाल, काळी टोपी विकल्या जातात. सहसा नागरिक याच रंगाच्या टोप्या वापरत असल्याचे विक्रेते सांगतात.
रक्ताची धुळवड खेळण्याची अनोखी परंपरा, सायंकाळी गावात होते तुफान दगडफेक, Video
काय आहेत दर?
सोलापुरात क्वालिटीनुसार टोपींचे दर आहेत. अगदी 50 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत टोप्या उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या व नवनवीन डिझाईनच्या टोप्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता येथून मागवल्या जातात, अशी माहिती टोपी विक्रेते देतात.